तमिळनाडूमध्ये द्रमुकचे सरकार असल्याने या कार्यकर्त्यांवर आणि पाद्य्रावरही कोणतीही कारवाई होणार नाही, हे लक्षात घ्या ! लोकशाहीचे रक्षक म्हणवणारे द्रमुकसारखे पक्ष खर्या अर्थाने लोकशाहीचे मारक आहेत, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
पाद्य्रांचे खरे स्वरूप सातत्याने अशा प्रकारच्या घटनांतून उघड होत असतांना भारतातील राजकारणी आणि प्रसारमाध्यमे मात्र यावर मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
तिरुवत्तुर (तमिळनाडू) – येथील वीयन्नूर गावामध्ये रहाणार्या एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अरुमनाई ख्रिश्चियन असोसिएशनचा (ए.सी.ए.’चा) सचिव असणारा पाद्री अरुमनाई स्टीफेन याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम्च्या (द्रविड प्रगती संघाच्या) जॉन ब्राइट, हेन्सलिन आणि जेबराज या कार्यकर्त्यांसह अन्य ७ जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Tamil Nadu: Christian pastor who had organised George Ponnaiah’s hate speech event booked on gang-rape chargeshttps://t.co/aly2KU7onH
— OpIndia.com (@OpIndia_com) August 12, 2021
१. कन्याकुमारी येथे एका कार्यक्रमात कॅथॉलिक पाद्री जार्ज पोनैया याने हिंदूंच्या देवतांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी आयोजक असणार्या पाद्री स्टीफेन याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेने बलात्कारची तक्रार केली.
२. विवाहित महिलेचा आरोप आहे, ‘मला गुंगी येणारे पेय पिण्यास दिल्यानंतर माझ्यावर सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले.’ या महिलेला फार्महाऊस (शेतातील घर) येथे नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या महिलेने एप्रिल मासामध्येच तक्रार केली होती; मात्र आरोपींचे संबंध सत्ताधारी द्रमुक पक्षाशी असल्याने त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. यांतील जॅफरसन याने कारवाईच्या भीतीने आत्महत्याही केली आहे.