हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा मान राखा अभियान
१५ ऑगस्टच्या निमित्ताने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस, प्रशासन, लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन इत्यादींना निवेदने देऊन राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी जनजागृती करण्यात येते. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणार्यांवर कारवाई करावी, तसेच १६ ऑगस्ट या दिवशी रस्त्यांवर इतरत्र पडलेल्या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेला योग्य ते आदेश देण्यात यावेत, अशा मागण्या निवेदनामध्ये करण्यात आलेल्या आहेत. गेली अनेक वर्षे ही मोहीम राबवण्यात आल्यामुळे तिचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात यश आले आहे. या वर्षी जिल्ह्यांमध्ये दिलेल्या निवेदनांची वृत्ते पाहूया.
१) आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथे पंचायत समितीमध्ये शिक्षणाधिकारी बी.सी. गुरव (डावीकडे) यांना निवेदन देतांना अभिजित साठे, तसेच अन्य. निवेदन स्वीकारल्यावर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक यांना निवेदन पाठवू, असे शिक्षणाधिकारी म्हणाले.
२) शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ठाणे अंमलदार बाजीराव सिंगण यांना निवेदन देतांना डॉ. संजय गांधी, तसेच अन्य
३) शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथील पोलीस ठाण्यात निवेदन पोलीस नाईक एस्.एस्. कुंभार (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
४) तासगाव (जिल्हा सांगली) येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक डी.पी. दराडे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ
५) तासगाव (जिल्हा सांगली) येथे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ प्रशांत खंडागळे, शिवसेनेचे कामगार संघटना जिल्हाउपाध्यक्ष सचिन चव्हाण
६) संभाजीनगर येथील सामान्य प्रशासन विभाग तहसीलदार शंकर लाड यांना हिंदु जनजागृती समितीचे पुरुषोत्तम जटावाले, नंदकिशोर बाखरिया, गणेश व्यवहारे, शशांक देशमुख, प्रकाश कुलकर्णी यांनी निवेदन दिले.
७) जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार पडघम यांना समितीचे जगदीश शिंदे, रवींद्र वरगने यांनी निवेदन दिले.
८) अंबड येथील तहसील कार्यालयातील अवल कारकून महसूल आसाराम विठोबा खाडे यांना हिंदु जनजागृती समितीचे रवींद्र अंबिलवादे, सचिन कदम, कृष्णा बियाणी, सचिन मुळे यांनी निवेदन दिले.