एका दिवसात १९ लाख लोकांनी पाहिला !
लव्ह जिहादच्या विरोधात चित्रपट बनवणारे दिग्दर्शक विनोद तिवारी आणि ‘नॉस्ट्रम एंटरटेनमेंट’ यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या चित्रपटाद्वारे हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’विषयी जागरूक होतील, अशी अपेक्षा !
नवी देहली – ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात बनवण्यात आलेल्या ‘द कन्व्हर्जन’ (धर्मांतर) या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर गेल्या २४ घंट्यांमध्ये १९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा चित्रपट येत्या सप्टेंबर मासामध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक विनोद तिवारी आणि ‘नॉस्ट्रम एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
१. ट्रेलरनुसार या चित्रपटामध्ये एका हिंदु तरुणीची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही मुलगी ‘बबलू’ अशा हिंदु नाव धारण केलेल्या मुसलमान तरुणावर प्रेम करते. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी विवाह करते; मात्र विवाहानंतर तिची स्थिती अत्यंत दयनीय होते. तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जातो, तिचा छळ केला जातो. यामुळे ही तरुणी ‘बबलू’च्या कह्यातून स्वतःची सुटका करून घेते. त्यानंतर अशा प्रकारच्या धर्मांधांच्या फसवणुकीच्या विरोधात आवाज उठवण्यास प्रारंभ करते.
२. दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी सांगितले की, मी अनेक काळापासून अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी योग्य संधीची वाट पहात होतो; कारण युवतींमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. हा चित्रपट केवळ प्रेमविवाहाविषयी नाही, तर भारतामध्ये प्रेमविवाहानंतर होणार्या धर्मांतराविषयीच्या संवेदनशील सूत्रावर आधारित आहे.
धर्मांधांकडून चित्रपटाला विरोध !
गेल्या मासामध्ये या चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर धर्मांधांकडून चित्रपटाला विरोध होऊ लागला. त्यांनी #BoycottTheConversionMovie या हॅशटॅगद्वारे (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) ट्रेंड (चर्चेत असलेला विषय) करत विरोध केला होता. (स्वतःचे कुकृत्य कुणी उघड करत असेल, तर धर्मांध लगेच एकजूट होऊन त्याचा विरोध करतात, तर हिंदू स्वतःवरील अन्यायाविषयीही निष्क्रीय रहातात ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) ‘या चित्रपटातून मुसलमानांच्या विरोधात चुकीचा संदेश जाईल’, असे सांगण्यात आले होते. (या चित्रपटातून धर्मांधांचे षड्यंत्र उघड होणार असल्याने असा कांगावा करण्याचा प्रयत्न होत आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)