Menu Close

‘बीबीसी मराठी’च्या इन्स्टाग्राम खात्यावर व्यंगचित्र प्रसारित करून हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली हिंसाचारी दाखवले !

बीबीसीचा हिंदूद्वेष !

  • बीबीसी सातत्याने हिंदूद्वेषाचा कंड शमवून घेण्यासाठी विविध प्रयत्न करत असते, त्यातीलच हे एक नवीन उदाहरण ! हिंदु संघटनांनी याविषयी केंद्र सरकारकडे  तक्रार करून बीबीसीवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करायला हवा !

  • बीबीसीने कधी हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांविषयी असे व्यंगचित्र का काढले नाही ? काश्मीरमधून धर्माच्या नावाखाली मशिदींमधून ध्वनीक्षेपकाद्वारे हिंदूंना बायका आणि संपत्ती सोडून जाण्यास सांगितले आणि नंतर त्यांच्यावर अत्याचार केले, याविषयी बीबीसी का बोलत नाही ?

  • ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराविषयी, त्यांच्या शाळांतून हिंदु विद्यार्थ्यांचे होणारे वैचारिक ख्रिस्तीकरण यांविषयी बीबीसी का बोलत नाही ?

मुंबई – बीबीसी या वृत्तसंस्थेच्या ‘बीबीसी मराठी’ या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्याद्वारे हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली कट्टरतावादी आणि हिंसक दाखवले आहे. मुसलमान व्यक्तीला मारहाण करून त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास लावण्यात आल्याच्या कथित वृत्ताचा संदर्भ देत ‘बीबीसी मराठी’ने हिंदूंना आक्रमक दाखवले आहे. या व्यंगचित्रमध्ये पालक अन्य एका पालकांशी बोलतांना म्हणतात, ‘‘आमचा मुलगा पुष्कळ धार्मिक आहे हो. लोकांना बदडून बदडून देवाचे नाव घ्यायला लावतो.’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *