Menu Close

‘रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोरी : राष्ट्रीय सुरक्षेवर संकट’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

अमानवीय रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीने भारतात राहू देणे, देशहितासाठी घातक ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात बेकायदेशीररित्या घुसवण्यात आले आहे. ते जम्मू-काश्मीर, आसाम, पंजाब, उत्तर भारत, मेवातसह (हरियाणा) देशातील अनेक भागात कॅन्सरसारखे पसरले आहेत. मेवातमध्ये तर हिंदूंच्या जागांवर अतिक्रमण करून हिंदु तरुणींचे अपहरण, बलात्कार, हिंदूंच्या हत्या, मंदिराची तोडफोड, घर बळकावणे आदी त्यांनी चालू केले आहे. अशा अमानवीय, तसेच अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी गुंतलेल्या रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून भारतात राहू देणे, हे देशहितासाठी घातक आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ते तथा सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. ते ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोरी : राष्ट्रीय सुरक्षेवर संकट’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त बोलत होते.

अधिवक्ता जैन पुढे म्हणाले की, प्रशांत भूषण आणि कॉलिन गोन्साल्विस यांसारखे अधिवक्ते सर्वोच्च न्यायालयात रोहिंग्यांसाठी लढत आहेत, तर ‘जकात फाऊंडेशन’सारख्या धर्मांध संघटना रोहिंग्यांना देशभरात वसवण्याचे काम करत आहे. याविषयी संपूर्ण देशभरात जनजागृती करायला हवी. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. विनोद बन्सल म्हणाले की, प्रथम शरणार्थी म्हणून आसरा घेतल्यावर हे लोक स्वत:ची लोकसंख्या वाढवून त्या देशात वर्चस्व निर्माण करतात. अशा प्रकारे त्यांनी जगातील 56 देश इस्लामिक केले आहेत. म्यानमारपासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या जम्मूमध्ये हजारो रोहिंग्यांना का वसवण्यात आले ? यामागे जम्मूला काश्मीरप्रमाणे हिंदुविहिन करण्याचा जिहादी विचार होता. रोहिंग्यांच्या वस्त्या भारतीय सैन्य दलाच्या तळाजवळ वसवून नंतर सैन्य तळांवर बाँबस्फोट केले गेले. वर्ष 2008 मध्ये दिल्लीतील शरणार्थींचा दर्जा मागण्यासाठी आलेले तीन हजार रोहिंग्या नंतर ते कुठे गेले, ते समजले नाही. त्यामुळे सरकारवर विसंबून न राहता सर्व हिंदूंनी स्वत: जागृत आणि संघटित झाले पाहिजे, तरच घुसखोरी थांबू शकेल. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले की, घुसखोर हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असतांनाही वर्ष 2012 मध्ये 40 हजार असणारी रोहिंग्यांची संख्या आता काही लाखांच्या घरात गेलेली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार भारतात 6 कोटींहून अधिक बांग्लादेशी घुसखोर आहेत. नव्या माहितीनुसार दिल्लीत 11 हजार अफगाणिस्तानचे घुसखोरही आलेले आहेत. त्यांनी दिल्लीत ‘मिनी काबुल’ वसवले आहे. दिल्लीत रोहिंग्यांच्या झोपड्या अचानक जळल्यावर तेथे ‘आप’च्या नेत्याने भेट दिली. रोहिंग्यांना दिल्ली सरकारकडून प्रत्येकाला अर्थसाहाय्य, नवीन घर, वीज, पाणी आदी देण्याचे जाहीर केले. हे म्हणजे बहुसंख्य हिंदूंनी कर भरायचा आणि सुविधा घुसखोरांना द्यायच्या, हे हिंदू कदापी सहन करणार नाहीत. घुसखोरांना मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास हिंदु ‘मानव’ म्हणून शिल्लक राहणार नाहीत. या वेळी हिंदु जनजागरण मंचचे आसामचे विधी प्रमुख अधिवक्ता राजीवकुमार नाथ म्हणाले की, आसामची हजारो किलोमीटरची सीमा म्यानमारला लागून आहे. त्यामुळे स्थानिक धर्मांधांच्या साहाय्याने रोहिंग्यांना पद्धतशीरपणे भारतात घुसवले जाते, ही वस्तुस्थिती आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *