Menu Close

बांगलादेशचेही तालिबान सरकारला ‘मैत्रीपूर्ण’ समर्थन !

  • इस्लामिक स्टेटला जसा इस्लामी देशांनी विरोध केला नव्हता, तसेच ते तालिबानलाही विरोध करत नाहीत उलट त्याला उघडपणे समर्थन देत आहेत, हे भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घेऊन भारतात ही स्थिती येऊ न देण्यासाठी राष्ट्रनिष्ठ झाले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • भारताच्या पूर्व आणि पश्चिम दिशेकडील दोन्ही इस्लामी देश आणि उत्तरेतील चीन तालिबानचे समर्थन करतात, हे भारतासाठी धोकादायकच ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार हे जनतेचे सरकार आहे. (तालिबान्यांच्या भीतीमुळे तेथील लोक अफगाणिस्तानातून पळ काढत आहेत, असे चित्र आहे. असे असतांना ‘ते जनतेचे सरकार आहे’, असे म्हणणे हास्यास्पद आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे बांगलादेश तालिबान सरकारचा स्वीकार करील, असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे.

मोमेन पुढे म्हणाले की, नवीन सरकार कुणाचे बनते, याने आम्हाला फरक पडत नाही. जर तालिबानच सरकार बनवत असेल, तर आमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे असतील. आमचा लोकशाही सरकारवर विश्वास आहे. बांगलादेशचे सर्वच देशांच्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तालिबानचेही समर्थन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. अफगाणिस्तानचा विकास व्हावा, हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही याकडे मित्रत्वाच्या भावनेतून पहातो.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *