Menu Close

काबुलमध्ये धाडसी महिलांकडून तालिबानी आतंकवाद्यांच्या समोर त्यांच्या विरोधात निदर्शने !

भारतात मुसलमान महिलांच्या हक्कांसाठी कट्टरतावादी इस्लामी संघटनांच्या विरोधात आंदोलन करण्यास घाबरणार्‍या कथित पुरोगामी महिलांनी यातून बोध घ्यावा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

काबुलमध्ये धाडसी महिलांकडून तालिबानी आतंकवाद्यांच्या समोर त्यांच्या विरोधात निदर्शने

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून येथील नागरिक धास्तावलेले आहेत. अशा भीतीच्या वातावरणात अफगाणी महिलांनी तालिबानच्या संभाव्य निर्बंधांच्या विरोधात निदर्शने केली. महिलांना शिक्षण घेण्याचे, तसेच नोकरी करण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशा मागण्या या महिलांनी केल्या. याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

१. तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने शरीयतच्या आधारावर महिलांना स्वातंत्र्य देणार असल्याचे म्हटले आहे. महिलांसमवेत भेदभाव होणार नसल्याची ग्वाही तालिबानने दिली आहे.

२. तालिबानने वर्ष १९९६ मध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर महिलांवर निर्बंध लादले होते. हे निर्बंध वर्ष २००१ पर्यंत तालिबानची सत्ता कायम असेपर्यंत होते. महिलांना बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली होती, तसेच त्यांना शिक्षण घेण्यावरही बंदी घालण्यात आली होती. या राजवटीत महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून समजले जात होते. महिलांच्या शोषणातही वाढ झाली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *