Menu Close

(म्हणे) ‘तालिबानी आतंकवादाप्रमाणे हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा !’

अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्याकडून तालिबानची पाठराखण !

अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या अटकेची मागणी

तालिबानी आतंकवादाचा अनुभव घेण्यासाठी स्वरा भास्कर यांना अफगाणिस्तानला पाठवण्याची मागणी

  • हिंदुत्व आणि तालिबान यांची तुलना करून स्वतःचीचबौद्धिक दिवाळखोरी दर्शवणार्‍या स्वरा भास्कर ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • ‘हिंदुत्ववादी आतंकवाद’ नावाची कपोलकल्पित संकल्पना मांडून आपला हिंदुद्वेषाचा कंड शमवणार्‍या स्वरा भास्कर यांचा निषेध ! अशांना हिंदूबहुल भारतात रहाण्याचा अधिकार तरी आहे का ? त्यांनी खुशाल अफगाणिस्तानमध्ये निघून जावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

अभिनेत्री स्वरा भास्कर

मुंबई – आपण तालिबानी आतंकवादाविरोधात आवाज उठवत आहोत. त्यावर तीव्र असंतोष व्यक्त करत आहोत; परंतु हिंदुत्ववादी आतंकवादावर आपण जाहीरपणे काहीच भाष्य करत नाही. आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा, असे ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी तालिबानी आतंकवाद्यांची तुलना हिंदुत्वनिष्ठांशी केली आहे. यामुळे अनेकांनी त्यांना विरोध करून अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या विरोधात ट्विटरवर #ArrestSwaraBhasker हा हॅशटॅग ट्रेंडही करण्यात आला.

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या काही ट्वीट्स

१. असे ट्वीट करून स्वराने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तिला शिक्षा झालीच पाहिजे.

२. उत्तरप्रदेश पोलिसांनी स्वरा भास्कर यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. त्या आपल्या हिंदु धर्माविरोधात अपशब्द वापरत आहेत.

३. स्वरा भास्करने हिंदुत्ववादी आतंकवादाचा अनुभव घेतला आहे, तर आता सरकारने त्यांना ६ मास तालिबानी आतंकवादाचा अनुभव घेण्यासाठी अफगाणिस्तानला अवश्य पाठवावे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *