-
विवाहानंतर धर्मांधाकडून पीडित युवतीचा छळ !
-
पोलिसांकडून ‘लव्ह जिहाद’ कायद्याच्या अंतर्गत तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ
-
पोलिसांच्या विरोधात हिंदु जागरण मंचाने आंदोलन
गुजरात राज्यात ‘लव्ह जिहाद’ कायदा अस्तित्वात असूनही धर्मांध त्याला जुमानत नाहीत, यावरून त्यांचा उद्दामपणा लक्षात येतो. त्यामुळे हा कायदा अधिक कडक करून त्याची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
पीडित हिंदु युवतीची ‘लव्ह जिहाद’च्या अंतर्गत तक्रार नोंदवून न घेणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? – – संपादक दैनिक सनातन प्रभात
सूरत (गुजरात) – येथे ५१ वर्षीय शेख महंमद अख्तर याने हिंदु नाव धारण करून एका २२ वर्षीय हिंदु तरुणीशी लग्न केलेे. विवाहानंतर तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि नमाजपठण करण्याची सक्ती करण्यात आली आणि त्यासाठी तिचा छळ केला. तिच्यावर धर्मांतर करण्यासाठीही दबाव आणण्यात आला. याप्रकरणी प्रारंभी ‘लव्ह जिहाद’ कायद्याच्या अंतर्गत तक्रार नोंदवायला पोलिसांनी टाळाटाळ केली; परंतु हिंंदु जागरण मंचाने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी या कायद्याच्या अंतर्गत तक्रार नोंदवली. (हिंदुत्वनिष्ठ संघटनेने आंदोलन केले नसते, तर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसती ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
१. मिळालेेल्या माहितीनुसार एका आस्थापनामध्ये पीडितेची अख्तरशी ओळख झाली. त्यानंतर त्याने मुकेश या खोट्या नावाने तिच्याशी परिचय वाढवला. तसेच तो रेल्वेमध्ये नोकरी करत असल्याचेही खोटे सांगितले.
२. कालांतराने वर्ष २०१९ मध्ये दोघांनीही हिंदु पद्धतीने लग्न केले आणि त्यांना एक मुलगा झाला. एक दिवस अख्तरच्या वागणुकीवरून पीडित तरुणीला संशय आला. त्यामुळे तिने त्याचे ओळखपत्र तपासले असता तो मुसलमान असल्याचे तिला समजले.
३. स्वतःचे खरे स्वरूप उघड झाल्यावर अख्तर याने पीडित तरुणीचा छळ करण्यास आरंभ केला, तसेच मुलाचेही धर्मांतर करण्यासाठी दबाव निर्माण केला.
तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !
अख्तर याचे खरे स्वरूप कळल्यावर पीडितेने डिंडोली पोलिसांकडे धाव घेतली. प्रारंभी पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास घेण्यास टाळाटाळ केली. पीडितेला ‘लव्ह जिहाद’ कायद्याच्या अंतर्गत तक्रार प्रविष्ट करायची होती; परंतु पोेलिसांनी हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी प्रकरण नोंदवले. त्यामुळे पीडितेने ‘हिंदु जागरण मंचा’शी संपर्क साधला. मंचाने पोलिसांच्या विरोधात २८ घंटे आंदोलन केेले. त्यानंतर पोलिसांनी ‘लव्ह जिहाद’ कायद्याच्या अंतर्गत प्रकरण नोंदवून घेतले. (गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे सरकार असतांना एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाला तब्बल २८ घंटे आंदोलन करावे लागते. यावरून येेथील पोलीस ‘लव्ह जिहाद’विषयी किती गंभीर आहेत, हे लक्षात येते. अशा पोलिसांचे तात्काळ निलंबन करून त्यांना करागृहात डांबले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडितेला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तिच्या माहेरच्या लोकांकडून १४ लाख रुपये हडप केले. अख्तर विवाहित असून त्याला ३२ वर्षांची एक मुलगी आहे. शहर पोलीस आयुक्त अजय तोमर या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत. ते म्हणाले की, या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेचेही अन्वेषण करण्याची आवश्यकता आहे. (पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणार्या पोलिसांवर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)