Menu Close

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत !’ – गीतकार मुन्नवर राणा

जर हिंदु तालिबानी असते, तर एव्हाना त्यांनी अन्य धर्मियांचा वंशविच्छेद केला असता; मात्र प्रत्यक्षात हिंदू तसे नसल्यामुळे देशात हिंदू बहुसंख्य असूनही अल्पसंख्य धर्मांधांकडून सतत मार खात आहे, ही वस्तूस्थिती आहे. हिंदु तालिबानी असते, तर मुन्नवर राणा हे बोलण्यासाठी जिवंत राहिले असते का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

तालिबान्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्‍यांना आता तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

गीतकार मुन्नवर राणा

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात काही प्रमाणात तालिबानी आहेत. याठिकाणी केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत. आतंकवादी केवळ मुसलमान असतो का ? तो हिंदूही असू शकतो. (हिंदू आतंकवादी असल्याचे एकतरी उदाहरण मुन्नवर राणा यांच्याकडे आहे का ? उलट मुसलमान आतंकवादी आहेत, याला पुरावा देण्याचीच आवश्यकता नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) म. गांधी साधे होते. नथुराम गोडसे तालिबानी होता. (म. गांधी यांनी भारताच्या फाळणीला मान्यता देऊन हिंदूंचा विश्‍वासघात केला. या निर्णयामुळे १० लाख हिंदूंची हत्या झाली. हे मुन्नवर राणा आणि सर्व गांधीप्रेमी यांनी कायमच लक्षात ठेवायला हवे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) उत्तरप्रदेशात तालिबान्यांसारखी कामे होत आहेत, अशी विधाने राज्यातील गीतकार मुन्नवर राणा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. (काश्मीरमध्ये ३० वर्षांपासून हिंदूंविषयी कोणते काम देशद्रोही धर्मांधांकडून केले जात आहे, हेही मुन्नवर राणा यांनी सांगायला हवे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

मुन्नवर राणा यांनी केलेली काही विधाने !

१. जितकी क्रूरता अफगाणिस्तानात आहे त्यापेक्षा अधिक क्रूरता आपल्याकडे आहे. (अशी क्रूरता असती, तर मुन्नवर राणा अशा प्रकारची हिंदूंच्या विरोधातील विधाने करण्यास धजावले नसते आणि केल्यानंतर त्यांची स्थिती काय झाली असती, हे त्यांनी लक्षात ठेवावे. प्रत्यक्षात असे काहीच झालेले नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) पूर्वी ‘रामराज्य’ होते आणि आता ‘कामराज्य’ आहे. (जगात एकूण ५२ मुसलमान राष्ट्रे आहेत आणि त्यांपैकी किती देशांत ‘रामराज्य’ आहे, हे मुन्नवर राणा यांनी सांगावे ! रामराज्य केवळ भारतात होते आणि भविष्यात येणार आहे. इस्लामी देशांमधील मानवाधिकारांचे हनन आणि अनाचार पाहून तेथे ‘रावणराज्य’ आहे, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. भारताला तालिबानला घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण अफगाणिस्तान आपल्यासमवेत सहस्रो वर्षांपासून एकत्र आहे. त्याने कधी भारताला हानी पोचवली नाही. (नादीरशाह आणि अब्दाली यांनी अनेक वेळा भारतावर आक्रमण करून अब्जावधी रुपयांची संपत्ती लुटून नेली. हिंदूंच्या महिलांना पळवून नेले, पानीपतच्या युद्धानंतर शेकडो मराठ्यांना बंदी करून अफगाणिस्तानला नेले, हा इतिहास मुन्नवर राणा का विसरत आहेत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) जेव्हा तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर याची अफगाणिस्तानमध्ये सत्ता होती, तेव्हाही त्याने कुठल्याही भारतियांना हानी पोचवली नाही.(तालिबानच्या काळात शेकडो हिंदू आणि शीख यांना पलायन करावे लागले होते. आजही लक्षावधी अफगाणी महिला आणि पुरुष तेथून पलायन करत आहेत, हे मुन्नवर राणा यांना दिसत नाही कि ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) कारण त्याचे पूर्वज भारतातून कमवून गेले आहेत. (कमवून गेले नाही, तर लुटून गेले ! अशा प्रकारे मुसलमान आक्रमकांची बाजू घेणार्‍यांना कारागृहात डांबलेच पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

३. जितक्या एके ४७ रायफली तालिबान्यांकडे आहेत तितक्या भारतातील माफियांकडे आहेत. तालिबानी हत्यारे लुटून किंवा मागून घेतात; परंतु आपल्या येथील माफीया हत्यारे खरेदी करतात. (अशी हत्यारे खरेदी करण्यामागे सर्वाधिक धर्मांध आहेत, हे मुन्नवर राणा का सांगत नाहीत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

४. धर्मांतरासारख्या सूत्रांमुळे देशाची हानी होते. (मोगल आक्रमकांनी तलवारीच्या जोरावर भारतातील लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले, त्या इतिहासाविषयी मुन्नवर राणा गप्प का आहेत ? मुन्नवर राणा यांचे वंशज अरब देशांतील आहेत कि भारतातील आहेत, हेही त्यांनी सांगायला हवे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

५. आपला देश पूर्वीसारखा होता तसा व्हावा, हीच आमची इच्छा आहे. (हिंदूंचीही तीच अपेक्षा आहे की, भारतात इस्लामी आक्रमण होण्यापूर्वी जसा सोन्याचा धूर निघणारा भारत होता, तसा भारत पुन्हा झाला पाहिजे. विश्‍वगुरु झाला पाहिजे. अशी स्थिती पुढील काही वर्षांत येणार आहे, हे मुन्नवर राणा यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *