काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानी आतंकवाद्यांनी अफगाणिस्तानमधील कंधार आणि हेरात येथे बंद करण्यात आलेल्या भारतीय दूतावासांमध्ये घुसखोरी केली. तालिबानी आतंकवाद्यांनी दूतावासाचे टाळे तोडले आणि ते आत घुसले. त्यांनी दूतावासांमध्ये असलेल्या कपाटांमधील काही कागदपत्रांचा शोध घेतला. तालिबान्यांनी या दूतावासाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यही पळवल्या आहेत.
Besides the embassy in #Kabul, India operated four consulates in #Afghanistan https://t.co/xrhydXTmQl #Taliban
— India TV (@indiatvnews) August 20, 2021
अफगाणी गुप्तचरांचा तालिबानकडून शोध
काबुलमध्ये तालिबानी आतंकवादी घराघरांत घुसून अफगाणी गुप्तचर यंत्रणा एन्.डी.एस्.साठी काम करणार्या अफगाणी नागरिकांचा शोध घेत आहेत. जलालाबाद आणि काबुल येथील भारतीय दूतावासांमध्ये तालिबानी आतंकवादी काय कारवाया करत आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेले नाही.