Menu Close

नागपूर येथे गेली १० वर्षे रहात असलेला धर्मांध हा तालिबानी आतंकवादी असल्याचे उघड !

अकार्यक्षम पोलीस यंत्रणा !

अफगाणिस्तानात गेल्यावर धर्मांधाने हातात ‘मशीन गन’ घेतल्याचे छायाचित्र प्रसिद्ध

  • गेल्या १० वर्षांपासून तालिबानी आतंकवादी नागपुरात रहात असतांना त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना का मिळाली नाही ? गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी झोपले होते का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • ‘शितावरून भाताची परीक्षा’ याप्रमाणे असे किती धर्मांध या देशात राहून देशाला पोखरत असतील ? भारताच्या सुरक्षेला खीळ बसवणार्‍या या स्थितीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • धर्मांधाने तालिबान्यांना पुष्कळ माहिती पाठवली असल्याशी दाट शक्यता आहे. हे भारताच्या रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. याला कुचकामी पोलीस यंत्रणा उत्तरदायी असल्याने संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
नूर महंमद उपाख्य अब्दुल हक

नागपूर – नूर महंमद उपाख्य अब्दुल हक (वय ३० वर्षे) हा तालिबानी आतंकवादी शहरातील दिघोरी परिसरात गेल्या १० वर्षांपासून नाव पालटून रहात होता. २३ जून २०२१ या दिवशी त्याला येथून हाकलण्यात आले होते. सध्या नूर अफगाणिस्तानात असून त्याने हातात ‘मशीन गन’ घेतल्याचे छायाचित्र प्रसारित झाले आहे. त्यामुळे अन्वेेषण यंत्रणा सतर्क झाल्या असून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. (नूर याचे छायाचित्र प्रसारित झाल्यावर आता लोकांची चौकशी करून काय उपयोग ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

१. आतंकवादी नूर महंमद याला १६ जून २०२१ या दिवशी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याची वैद्यकीय पडताळणी केली असता त्याच्या शरिरावर गोळ्या लागल्याच्या जखमा दिसून आल्या होत्या. त्याच्या भ्रमणभाषमध्ये अनेक व्हिडिओ मिळाले. त्यानंतर भारत सरकारने अफगाणिस्तानच्या दूतावासाशी संपर्क साधून त्याला अफगाणिस्तानकडे सुपूर्द केले.

२. नूर हा वर्ष २०१० मध्ये ६ मासांच्या ‘टूरिस्ट व्हिसा’वर भारतात आला होता. त्याने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये शरण मागण्याचा अर्ज केला होता; परंतु त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. तेव्हापासून तो येथे नाव पालटून अनधिकृतपणे रहात होता.

३. नूर अविवाहित असून तो नागपूर शहरात चादरी विकत असे. त्याचा भाऊही तालिबानी असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी नूर याने धारदार शस्त्रासह एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केला होता. तेव्हा पोलिसांच्या तावडीत सापडून ‘तो अफगाणी तालिबानी आहे’, असे निदर्शनास आले. सामाजिक माध्यमांवर तो इतर काही आतंकवाद्यांनाही ‘फॉलो’ करत असल्याचे समोर आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *