Menu Close

बेंगळुरू शहरामध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

पोलिसांकडून पीडित मुलीचा शोध घेण्यास टाळाटाळ

हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला !

  • हिंदु मुलींचे अपहरण करणार्‍या धर्मांधांना आयुष्यभर कारावासाची शिक्षा ठोठावल्यास पुन्हा कुणी धर्मांध हिंदु मुलीला हात लावायचे धाडस करणार नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • मुलीचा शोध घेण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांची चौकशी करून त्यांना शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करावे, जेणेकरून हिंदु मुलींच्या अपहरणाविषयी पोलिसांत संवेदनशीलता आणि सतर्कता निर्माण होईल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
प्रतिकात्मक छायाचित्र

बेंगळुरू (कर्नाटक) – शहरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याची घटना घडली. प्रथम मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली; मात्र हिंदु जनजागृती समितीने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने मुलीचा शोध घेतला. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे.

१. १० व्या इयत्तेत शिकणारी १५ वर्षीय मुलगी तिची आई आणि मावशी यांच्या समवेत बेंगळुरू शहरात रहाते. ५ ऑगस्ट या दिवशी मुलीने अभ्यास न केल्यावरून तिची आई तिला रागावली. त्यामुळे मुलगी घरून निघून गेली. सायंकाळपर्यंत मुलगी घरी परतली नाही म्हणून मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला. दुसर्‍या दिवशी मुलीच्या कुटुंबियांनी येथील ब्याडरहळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि एका धर्मांधावर संशय व्यक्त केला.

२. पोलिसांनी त्या धर्मांधाचा भ्रमणभाष क्रमांक घेतला आणि त्यावरून त्याच्या परिचितांकडे चौकशी केली. तो आधी बेंगळुरूमध्ये एका ठिकाणी काम करत होता. नंतर तो दुसर्‍या एका शहरात गेला आणि तेथून पुन्हा तिसर्‍या शहरात गेल्याचे पोलिसांना समजले.

३. काही दिवसांनी मुलीच्या कुटुंबियांनी परत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन धर्मांध मुलाचा भ्रमणभाष चालू असून त्याला शोधण्यासंदर्भात पोलिसांकडे आवेदन दिले. या समवेतच अन्य एका धर्मांधावरही संशय असल्याचे सांगितले; मात्र पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यापर्यंत विषय नेल्यावर पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला कुटुंबियांच्या स्वाधीन केले !

शेवटी मुलीच्या कुटुंबियांनी हिंदु जनजागृती समितीकडे साहाय्य माागितले. ९ ऑगस्ट या दिवशी समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी यांना ‘मेन्शन’ करत (उद्देशून) ‘पीडितांना न्याय द्या’, अशा विनंतीचे ट्वीट केले. त्यानंतर शहर पोलीस त्वरित सक्रीय झाले. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना मुलगी अमुक एका शहरात असल्याचे सांगितले.

हे शहर त्या मुलीच्या शहरापासून १ सहस्र किलोमीटर अंतरावर आहे. वाहनाचा व्यय मुलीच्या कुटुंबियांना परवडणारा नव्हता. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना आवेदन दिले. त्यानंतर अधिकार्‍यांनी स्वत: कारवाईला प्रारंभ केला, तसेच  पोलिसांचे २ गट बनवून राज्यातील २ शहरांमध्ये मुलीचा शोध घेतला. शेवटी ११ ऑगस्टच्या मध्यरात्री १ वाजता मुलगी सापडली आणि तिला बेंगळुरू शहरातील ब्याडरहळ्ळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले. पोलीस पुढील अन्वेषण करत असून संबंधित धर्मांधाला अटक करण्यात आल्याचे समजते. हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या पुढाकारामुळे मुलगी सापडली असल्याने कुटुंबियांनी समितीचे आभार व्यक्त केले आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *