Menu Close

धनबाद (झारखंड) येथील राजकमल विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांना करण्यात आले ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ

धनबाद (झारखंड) – १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथील राजकमल विद्या मंदिर शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले. या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाला शिक्षक आणि विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती. या वेळी समितीच्या कु. कनक भारद्वाज यांनी मुलांना ‘राष्ट्रध्वजाचा खेळणे म्हणून वापर करणार नाही, तोंडवळा किंवा कपडे यांवर राष्ट्रध्वजाच्या रंगांचा वापर करणार नाही, राष्ट्रध्वजाच्या रंगांची मुखपट्टी (मास्क) वापरणार नाही’, अशा आशयाची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस्.के. मिश्रा यांनी विशेष सहकार्य केले.

हिंदु जनजागृती समितीचे पोलीस प्रशासनाला निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्याच्या संदर्भात कतरास पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे प्रदेश गोरक्षा प्रमुख श्री. कमलेश सिंह, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुदीप गुप्ता, समितीचे सर्वश्री सुरेंद्र चौधरी, समरपाल सिंह, सरजू केशरी, श्रवण अगरवाल आणि दीपक केशरी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *