Menu Close

पाकिस्तानमध्ये ५० वर्षीय मौलवीकडून ३ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीवर बलात्कार !

भारतातील महिला असुरक्षित असल्याची ओरड करणारे असदुद्दीन ओवैसी आता गप्प का ?

पाकिस्तानमध्ये कट्टरतावादी धर्मांधांपासून अल्पसंख्यांक समाजातील लहान मुलीही सुरक्षित नाहीत, हेच या घटनेवरून लक्षात येते. यावरून तेथील महिलांची स्थिती किती भयावह असेल, याची कल्पना करता येईल. भारतातील क्षुल्लक घटनांवर कांगावा करणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि ख्रिस्ती संघटना अशा वेळी कुठे लपून बसतात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

प्रतिकात्मक छायाचित्र

लाहोर – पाकिस्तानच्या लाहोरमध्ये डॉ. महंमद सलीम नावाच्या ५० वर्षीय मौलवीने ३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मौलवीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलगी एका खाजगी आस्थापनाकडून चालवण्यात येत असलेल्या शाळेत शिकण्यासाठी गेली होती. तेथून परत येत असतांना आरोपी सलीमने तिच्यावर बलात्कार केला.

पाकमधील अल्पसंख्यांकांच्या हितांसाठी लढणारे मानवाधिकार कार्यकर्ते श्री. राहत ऑस्टिन यांनी ‘सनातन प्रभात’ला पाठवलेल्या माहितीनुसार, लाहोर येथील रायविंड सुंदर रस्त्यावर असलेल्या ख्रिस्ती वसाहतीमध्ये या मौलवीने मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याची माहिती अल्पसंख्यांक खात्याचे प्रांतीय मंत्री एजाज आलम आगस्टीन यांना देण्यात आली. ऑगस्टीन यांनी याची दखल घेत पोलीस अधिकार्‍यांना आदेश देताच मौलवीला अटक करण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *