-
हे आहे इस्लामी देशांचे ढोंगी मुसलमानप्रेम ! स्वतःच्या असहाय बांधवांना साहाय्य न करणारे इस्लामी देश अन्य धर्मियांशी कसे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
-
सीरियामध्ये ‘इस्लामी स्टेट’ या आतंकवादी संघटनेने तेथील नागरिकांवर अत्याचार केल्यावर तेथील लाखो लोकांना युरोपमधील देशांनी आश्रय दिला होता; मात्र इस्लामी राष्ट्रांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. आताही एखाद-दुसर्या इस्लामी राष्ट्र अफगाणी नागरिकांना साहाय्य करत आहेत. अशांना भारतातील काश्मिरी मुसलमानांवर होणार्या कथित अत्याचारांविषयी बोलण्याचा काय अधिकार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
-
इस्लामी राष्ट्रे अफगाणी निर्वासितांना आश्रय देण्याविषयी उदासीन असतांना भारताने मात्र सहिष्णुता दाखवत त्यांना साहाय्य करण्याची अपेक्षा बाळगणारे भारतातील निधर्मीवादी आणि पुरोगामी इस्लामी राष्ट्रांवर टीका करण्यास कचरतात, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
इस्तंबुल (तुर्कस्तान) – अफगणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यामुळे लक्षावधी अफगाणी नागरिक पलायन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानचे शेजारील देश चिंतीत झाले आहेत. हे अफगाणी नागरिक विशेषतः ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, तुर्कस्तान आणि पाकिस्तान या देशांत आश्रय घेण्यासाठी जात आहेत. हे अफगाणी नागरिक इराणमार्गे तुर्कस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी तुर्कस्तान इराणच्या सीमेवर २९५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत बांधत आहे. आता केवळ ५ किलोमीटरचे काम शिल्लक राहिले आहे. जे निर्वासित काही आठवडे आणि मासांपूर्वी पलायन करून गेले होते ते आता सीमा भागात दिसू लागले आहेत.
Turkey building a 295 km long wall along Iran border to stop refugee influx from Afghanistan: Reports https://t.co/3WD8rqQSEu
— OpIndia.com (@OpIndia_com) August 17, 2021
तुर्कस्तानच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षादलांनी ६९ सहस्र अफगाणी स्थलांतरितांच्या प्रवेशास प्रतिबंध केला आहे आणि मानवी तस्कर असल्याचा आरोप असलेल्या ९०४ संशयितांना अटक केली आहे.
(म्हणे) ‘तुर्कस्तान निर्वासितांचे गोदाम बनणार नाही !’ – तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन
कुठे मुसलमान निर्वासितांविषयी असे म्हणणारा तुर्कस्तान, तर कुठे कोट्यवधी घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांचा ‘गोदाम’ झालेला भारत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी म्हटले की, अफगाणिस्तानमधून तुर्कस्तानमध्ये निर्वासितांचे लोंढे आले आहेत. तालिबानमधून पळून जाणार्या अफगाणींचे दायित्व स्वीकारण्यासाठी युरोपीय देशांनी पुढे आले पाहिजे. (स्वतःचे दायित्व ख्रिस्ती युरोपीय देशांवर ढकलणारा तुर्कस्तान ! यातून पुढे युरोपीय देश मुसलमानबहुल बनावेत, अशी त्याची सुप्त इच्छा आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) असे झाल्यास तुर्कस्तान निर्वासितांचे गोदाम बनणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.