ब्रिटनमधील इस्लामी उपदेशक अंजेम चौधरी यांचा तालिबान्यांना सल्ला
अशी स्थिती भारतात येण्यापूर्वी सर्व हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करावी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
नवी देहली – ब्रिटनमध्ये विद्वेष पसरवणारे उपदेशक अंजेम चौधरी यांनी तालिबान्यांना अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक न्यायाप्रमाणे कठोर शिक्षा लागू करण्याचा आग्रह धरला आहे. ज्यामध्ये भेसळ करणार्यांना दगड मारणे, चोरांचे हात छाटणे आणि मद्यपान करणार्यांना मारहाण करणे आदींचा समावेश आहे. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सध्याची न्यायालयीन व्यवस्था संपुष्टात आणावी आणि त्या ठिकाणी शरीयत न्यायालये चालू करून कठोर कायदे लागू करावेत, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.
Choudary says the #Taliban must enforce strict #ShariaLaw, and run only sharia courts, getting rid of existing bodies such as high courts and supreme courts.https://t.co/yrgzaWpJGR
— India TV (@indiatvnews) August 22, 2021
१. इसिसचे समर्थन केल्याप्रकरणी ५ वर्षांपूर्वी कारागृहामध्ये बंद असलेल्या इस्लामी उपदेशक चौधरी यांची सुटका झाली होती. त्यानंतर त्यांना सार्वजनिक स्वरूपात बोलण्यास बंदी घालण्यात आली होती; परंतु नुकतीच ही बंदी हटवण्यात आली आहे.
२. चौधरी यांनी तालिबान्यांना सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये रहाणार्या मुसलमानेतरांकडून ‘जिझिया’ कर गोळा करण्यात यावा आणि अफगाणिस्तानचे नाव पालटून ‘इस्लामिक स्टेट’ करण्यात यावे, ज्याला इसिसने खिलाफत घोषित करून त्यांचे क्षेत्र असल्याचे म्हटले होते. तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या सर्व सीमा हटवून समस्त मुसलमानांना नवीन इस्लामिक स्टेटचे नागरिक होण्यासाठी आवाहन करावे, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.