Menu Close

तालिबान्यांना जेवण आवडले नाही; म्हणून त्यांनी महिलेला जिवंत जाळले !

अफगाणिस्तान – तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथील महिलांच्या नरकयातनांना प्रारंभ झाला आहे. जेवण आवडले नाही; म्हणून तालिबान्यांनी एका महिलेला चौकात जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. अफगाणिस्तानमधील माजी न्यायाधीश नजला यांनी ही माहिती दिली. (तालिबान्यांनी क्रौर्याची एवढी सीमा गाठल्यानंतरही मानवतेचा डांगोरा पिटणार्‍या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटना आणि महिला आयोग यांचा आवाज कुठेही ऐकू येत नाही. भारतात एखाद्या क्षुल्लक घटनेनंतरही झोपेतून उठून जागे होणार्‍या या संघटना तालिबान्याच्या क्रौर्याविषयी बोलत का नाहीत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

नजला अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या अधिकारासाठी काम करतात. त्यांनी एका माध्यमाशी बोलतांना सांगितले, ‘‘काही दिवसांपूर्वीच तालिबानने सांगितले होते की, त्यांना हिंसाचार नको आहे. इस्लामच्या शरीयत कायद्यानुसार ते महिलांना शिक्षण आणि नोकरीची संधीही देणार आहेत. प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नाही. तालिबान्यांनी पहिल्या दिवसापासून हिंसाचार चालू केला आहे.’’

नजला म्हणाल्या की, तालिबानी घरोघरी जाऊन नागरिकांकडून धान्य गोळा करतात, तसेच घरातील महिलांनाही बळजोरीने जेवण बनवायला सांगतात. त्यांना ज्यांच्या हातचे जेवण आवडते. त्यांना ते त्यांच्या समवेत घेऊन जातात. तसेच ज्यांच्या हातचे जेवण त्यांना आवडत नाही, त्या महिलांना ते थेट मारून टाकतात. तेथे उंच सॅन्डल्स, तोकडे कपडे घालण्याची मनाई आहे. तालिबानी पैसे मिळवण्यासाठी अफगाणिस्तानमधील महिलांना शेजारच्या देशांमध्ये विकत आहेत. नोकरदार महिलांना नोकरी करण्यास बंदी करण्यात आली असून त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *