धर्मांधांकडून ‘मूर्तीपूजेमध्ये दम नाही’, असे विधान !
गोमांस खाण्यास नकार दिल्यावर धर्मांधांकडून मारहाण
- हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर धर्मांतरबंदी कायदा करणे, ही काळाची आवश्यकता आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
- हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच आमिषांना बळी पडून ते धर्मांतर करतात. केंद्र सरकारने हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यापक व्यवस्था करावी, असेच हिंदु धर्मप्रेमींना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
- फेसबूकवरून अल्पसंख्यांकांच्या धार्मिक गोष्टींचा चुकूनही अवमान झाला, तरी हिंसा करणारे ‘शांतीदूत’ कुठे आणि हिंदु उपासनापद्धतींचा अवमान झाल्यावरही हातावर हात ठेवून ‘शांत’ बसणारे हिंदू कुठे ! हिंदूंमधील अशा धर्माभिमानशून्यतेमुळेच आज त्यांना जगात कुठेही किंमत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
मेवात (हरियाणा) – राज्यात धर्मांधांकडून पद्धतशीरपणे गरीब हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यात असलेल्या बरोट येथे मौलानांनी पैशाचे आमीष देऊन मनोज कुमार नावाच्या एका हिंदु युवकाचे धर्मांतर केले. त्यानंतर दोन मौलानासहित चार धर्मांधांनी तो गोमांस खात नाही, हे पाहून त्याला मारहाण केली, तसेच हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरून ‘मूर्तीपूजेमध्ये दम नाही’, असे विधान केले. या प्रकरणी चौघांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांपैकी अबू बकर याला अटक केली असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.
‘मूर्ति पूजा में कोई दम नहीं है’ : अबू बकर समेत 4 ने करवाया हिंदू युवक का धर्म परिवर्तन, गोमाँस न खाने पर पीटा#Mewat #ReligiousConversion https://t.co/XDc8TfaVFV
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 23, 2021
१. ‘दैनिक पंजाब केसरी’नुसार पीडित मनोज कुमार याने दिलेल्या माहितीप्रमाणे एप्रिल २०२० मध्ये अबू बकर, मौलाना दिलशाद, मौलाना मुबीन, मास्टर सोहराब आदींनी पैशांचे आमिष दाखवून त्याचे धर्मांतर केले होते. त्यावेळी दिलशादने कागदपत्रे सिद्ध करून त्याला धर्मांतर करण्यास सांगितले, तसेच हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून ‘मूर्तीपूजेमध्ये दम नाही’, असे विधान केले.
२. मनोजने सांगितले की, सर्वांनी मिळून अशी स्थिती निर्माण केली की, त्याला धर्मांतर करणे भाग पडले. धर्मांतर केल्यानंतर त्याला काही पैसे देण्यात आले आणि लग्न लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
३. धर्मांतर झाल्यानंतर त्याला सलंबा या गावी स्थायिक करण्यात आले. त्यानंतर त्याला अन्य हिंदूंचे धर्मांतर करण्यास सांगण्यात आले. आरोपींनी त्याला गोमांस खाण्यासाठी आग्रह केला असता त्याने ते खाण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला मारहाणही करण्यात आली.
४. त्याला धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात आल्यानंतर त्याने याविषयी त्याच्या वडिलांना माहिती दिली. आरोपींनी त्याला भेटण्यास आलेल्या वडिलांचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. मनोजने आरोपींच्या तावडीतून सुटका करून थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार प्रविष्ट केली. मनोजने सांगितले की, आरोपी ‘दावत-ए-इस्लाम’ आणि ‘ग्लोबल पीस’ ही केंद्रे चालवतात. त्या माध्यमातून ते गरीब हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.