कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांचे द्वेषपूर्ण विधान !
- संघ जर तालिबानसारखा असता, तर ध्रुवनारायण यांना उघडपणे असे विधान करण्याचे धाडस झाले असते का ? तालिबानकडे आहेत, तशी शस्त्रे संघाकडे आहेत का ? संघ कधी जनतेवर अत्याचार किंवा त्यांना ठार करतो का ? आत्यंतिक द्वेषापायी हिंदुत्वनिष्ठ संघटनेवर खालच्या थराला जाऊन आरोप करणार्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवावी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
- काँग्रेसने म. गांधी यांच्या हत्येनंतर सहस्रो ब्राह्मणांच्या, तसेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीमध्ये साडेतीन सहस्र शिखांच्या हत्या केल्याचा तिच्यावर आरोप आहे. हे तालिबानपेक्षा अल्प नाही. याविषयी ध्रुवनारायण तोंड का उघडत नाहीत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
मैसुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मी तालिबानशी केली होती. धर्माच्या आधारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालतो आणि तालिबानदेखील तेच करत आहे; म्हणून मी संघाची तुलना तालिबानशी केली. भाजप आणि रा.स्व. संघ यांनी कितीही विरोध केला, तरी माझे म्हणणे मी मागे घेणार नाही, असे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (‘के.पी.सी.सी.’चे) कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलतांना ध्रुवनारायण म्हणाले की, रा.स्व. संघाच्याच्या संदर्भात मी केलेल्या वक्तव्यावर ठाम आहे; कारण महिलांना संघामध्ये प्रतिनिधित्व नाही. (काँग्रेसच्या अधिवक्ता असणार्या नेत्यावर त्याने महिला अधिवक्त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे, अन्य एका नेत्याने भर सभेत स्वपक्षाच्याच महिला कार्यकर्तीविषयी बोलतांना अश्लाघ्य शब्दप्रयोग केला होता. अनेक अनेक आरोप काँग्रेसवाल्यांवर असतांना त्यांना अन्यांवर असा आरोप करण्याचा काय अधिकार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
आरएसएस की तुलना तालिबान से करने वाले बयान को लेकर भाजपा, कांग्रेस कर्नाटक में आमने-सामने#BJP #Congress #RSS #HindutvaTerror #Taliban #PanjshirValley #ThirdWave #GiftOfHome #LoveIsland #BoycottMyntra #Indore #panjshirResistance #UmarKhalid #ArunJaitleyhttps://t.co/cud4cThbDL
— Dainik Bhaskar Hindi (@DBhaskarHindi) August 24, 2021