Menu Close

(म्हणे) ‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते !’

सामाजिक माध्यमांवर कबिर खान यांच्यावर टीका !

  • लक्षावधी हिंदूंची क्रूरपणे हत्या करणार्‍या आणि सहस्रावधी मंदिरे लुटून, ती पाडून तेथे मशिदी बांधणार्‍या मोगलांचे उदात्तीकरण करणारे हिंदुद्वेष्टे दिग्दर्शक कबिर खान यांचा जावईशोध ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • मोगलांचा उदो उदो करणार्‍या कबिर खान यांना आजन्म कारागृहात टाकण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटायला नको ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • याच मोगलांचे वंशज असलेले तालिबानी आज अफगाणिस्तानची नवनिर्मिती करत आहेत, असे खान यांना म्हणायचे आहे का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात 

    कबिर खान

मुंबई – ‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते; मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या, असे तुम्ही म्हणत असाल, तर ते कशाच्या आधारे म्हणत आहात ? हे आम्हाला सांगितले पाहिजे’, असे वक्तव्य हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक कबिर खान यांनी करून मुक्ताफळे उधळली आहेत. (स्वत:च्या अज्ञानाचे धिंडवडे काढणारे कबीर खान ! केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास जरी केला, तरी मोगलांनी भारतावर किती आक्रमणे केली आणि किती हत्याकांडे घडवली ? हे खान यांना समजले असते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) त्यांच्या या हिंदुद्वेष्ट्या वक्तव्यावर ‘ट्विटर’वरून पुष्कळ टीका होऊ लागली आहे.

कबिर खान पुढे म्हणाले की,

१. ‘बॉलिवूड’च्या चित्रपटांत मोगलांना कायम खलनायक दाखवले जाते. लोकप्रिय कथानकासाठी हे सर्व केले जात आहे; पण मला हे पाहून अस्वस्थ व्हायला होते. माझ्या मते तुम्हाला मोगलांना न्यून लेखायचे असेल, तर त्याआधी थोडे संशोधन करा ! (मुळात चित्रपटांतून मोगलांना अमानुष दाखवले, तर खान यांना पोटशूळ का उठतो ? जर खान यांनीच इतिहासाचे प्रामाणिकपणे संशोधन केले, तर त्यांना त्यांच्या हास्यास्पद विचारांचे खंडण स्वत:च करता येईल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. मोगलांना न्यून लेखणारे, त्यांच्याविषयी चुकीचे संदर्भ देणारे चित्रपट मी सहन करू शकत नाही. (‘उचलली जीभ अन् लावली टाळ्याला’ याप्रमाणे अभ्यासहीन वक्तव्य करणारे कबिर खान ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

मोगलांनी हिंदूंची हत्या करण्यासमवेत मंदिरेही नष्ट केली ! – विवेक अग्निहोत्री, चित्रपट निर्माते

प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी ‘ट्विटर’वर कबीर खान यांना उद्देशून म्हटले, ‘‘एकदा मुलगा वडिलांना म्हणतो, ‘‘बाबा ‘गूगल’ हे मोगलांनी बनवलेली राष्ट्रे का शोधू शकत नाही ?’’ यावर वडील म्हणतात, ‘‘बेटा, ती राष्ट्रे ही भारतातील मंदिरांच्या आत लपून बसली आहेत.’’ अग्निहोत्री पुढे म्हणतात, ‘‘मोगलांनी केवळ लोकांचे शिरकाण करणे, तसेच असंख्य मंदिरांना नष्ट करण्याचे काम केले आहे.’’ (विवेक अग्निहोत्री यांनी परखड मत मांडल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! ऊठसूठ हिंदूंच्या विरोधात आकांडतांडव करणारे ‘बॉलिवूड’मधील कलाकार कबीर खान यांच्या निराधार वक्तव्यांच्या विरोधात ‘ब्र’ही काढत नाहीत. अशांना वैध मार्गाने खडसावण्याची आवश्यकता आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *