उज्जैन : उज्जैन सिंहस्थ कुंभमधील दत्त आखाडा क्षेत्रामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयकडून सत्यम् शिवम सुंदरम् आध्यात्मिक मेळा या कार्यक्रमात चैतन्य देवींची प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटन भगवद्गीता कथावाचक पंडित देवकीनन्दन ठाकुरजी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रदर्शनात देवींचे काळानुसार रूप आणि कार्य कसे पालटत गेले आहे, त्याची माहिती दृकश्राव्य माध्यमातून सादर केली गेली.
या वेळेस उपस्थितांना संबोधित करतांना पंडित देवकीनन्दन महाराज म्हणाले, मुलींच्या जन्माच्या आणि लग्नाच्या वेळेस लक्ष्मी घरी आली असे म्हटले जाते. हिंदु संस्कृतीत नारी सर्वत्र पूज्यनीय आहे. या संस्थेच्या माध्यमातून अथक श्रम घेऊन कार्य करत असलेल्या दीदींना मी नमस्कार करतो.
तर उपस्थितांना संबोधित करतांना पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ईश्वरीय हिंदु राष्ट्र ही काळाची आवश्यकता आहे. त्या कार्याला आरंभ झाला आहे. स्त्री ही देवीचे प्रतीक आहे म्हणून ती सर्व ठिकाणी पूज्यनीय आहे. ती अखंड शक्तीचे स्त्रोत आहे.
क्षणचित्रे
१. या वेळी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाकडून दीपप्रज्ज्वलनासाठी मेणबत्ती दिली असता पू.(डॉ.) पिंगळेकाका यांनी नम्रपणे त्यास नकार देऊन आगपेटीतील काडीद्वारे दीपप्रज्ज्वलन केले.
२. या वेळी उभय संतांना पूर्ण चैतन्य देवींचे प्रदर्शन दाखवण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या मुलाखातीचे ब्रह्मकुमारी संस्थानच्या पीस ऑफ माइंड दूरचित्रवाहिनीवर थेट प्रसारण !
अध्यात्माविना विज्ञान म्हणजे विनाशाकडे वाटचाल आहे ! – पू.(डॉ.) चारूदत्त पिंगळे
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाकडून आयोजित प्रदर्शनीत भाग घ्यायला पू. (डॉ.) ब्रह्मकुमारी मंजू बहनकडून मुलाखात घेऊन त्याचे थेट प्रसारण करण्यात आले. या वेळेस विज्ञान आणि अध्यात्म यांत कसे साम्य आहे. ते विचारले गेले. त्याचे उत्तर देत पू. (डॉ.) पिंगळे म्हणाले, अध्यात्म आणि विज्ञानाने नाते पिता-पुत्राप्रमाणे आहे. ज्या प्रकारे मुळाशिवाय झाड नाही. त्याप्रमाणे अध्यात्माशिवाय विज्ञान नाही. अध्यात्माविना विज्ञान म्हणजे विनाशाकडे वाटचाल आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात