Menu Close

हिंदु धर्म आणि हिंदू यांवर टीका करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश !

  • हिंदु धर्मावर टीका करणार्‍या आणि हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधणार्‍यांनी अशी कितीही पूजा-अर्चा केली, तरी त्यांची पापे धुतली जाणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात

  • हिंदु धर्मावर टीका करणारे ‘आम्हीही हिंदू असून केवळ धर्मातील वाईट गोष्टींवर टीका करतो’, असे सांगत पूजा-अर्चा करण्याचे नाटक करतात. अशा ढोंगी हिंदूंपासून हिंदूंनी सावध रहाणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश

मुंबई – सातत्याने हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर टीका करणार्‍या हिंदी चित्रपटसृष्टीतील साम्यवादी विचारसरणीच्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी स्वतःच्या घरी श्री गणेशपूजा, श्रीसत्यनारायणपूजा, रूद्राभिषेक, यज्ञवहन आदी विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश केला. याविषयीची छायाचित्रे त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली आहेत. ‘ही पूजा ७ घंटे करण्यात आली. पुजार्‍याने या वेळी विविध प्रकारच्या ७ पूजा केल्या’, अशी माहितीही स्वरा भास्कर यांनी सामाजिक माध्यमांवर दिली आहे. यानंतर स्वरा भास्कर यांनी हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्या विरोधात सातत्याने केलेल्या वक्तव्यांची जाणीव करून देत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे, तर अनेकांनी त्या योग्य मार्गावर आल्याचे म्हणत त्यांचे अभिनंदनही केले आहे.

ही छायाचित्रे प्रसारित झाल्यावर एका व्यक्तीने ‘महादेवाकडून वरदान प्राप्त करण्यासाठी पूजा करून त्याला प्रसन्न करतांना प्राचीन भारतातील एक राक्षस’, अशी टिपणी केली आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तावर केलेल्या आक्रमणाविषयी त्यांचे समर्थन करतांना स्वरा भास्कर यांनी ‘आम्ही हिंदु आतंकवादाची स्तुती करू शकत नाही. तालिबानच्या आतंकवादावर आपण मौन बाळगले पाहिजे आणि हिंदु आतकंवादावर आपला रोष व्यक्त केला पाहिजे’, असे ‘ट्वीट’ करून हिंदूंनाही ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न केला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *