Menu Close

‘हॉटस्टार’वरून इस्लामी आक्रमक बाबरावर आधारित ‘द एम्पायर’ या वेब सिरीजचे प्रसारण !

  • श्रीराममंदिर उद्ध्वस्त करणार्‍या बाबराचे अश्लाघ्य उदात्तीकरण !

  • भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट !

हिंदु मंदिरांचा विध्वंस करणार्‍या आणि इस्लामी आक्रमकांचा उदोउदो करणारे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आदींना आजन्म कारावासाची शिक्षा व्हायला हवी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

मुंबई – ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ या ‘ओटीटी ॲप’वर अमानुष आणि पाशवी मोगल आक्रमक बाबरावर आधारित ‘द एम्पायर’ ही ‘वेब सिरीज’ प्रसारित करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट या दिवशी याचा ‘प्रिमियर’ (पहिला सार्वजनिक खेळ) आयोजित करण्यात आला होता. ‘द एम्पायर’ ही आतापर्यंतची सर्वांत महाग आणि भव्य सिरीज असल्याचे म्हटले जात आहे. बाबरासारख्या आक्रमकाचे उदात्तीकरण करणार्‍या या षड्यंत्राचा विरोध होणे आवश्यक आहे. ही सिरीज निखील अडवाणी यांनी बनवली असून मिताक्षरा कुमार यांनी दिग्दर्शित केली आहे, तसेच ॲलेक्स रूथफोर्ड यांच्या ‘एम्पायर ऑफ द मुघल’ या पुस्तकावर आधारित आहे. (‘द एम्पायर’ वेब सिरीजसारख्या कुटील प्रयत्नांतून भारत आणि हिंदूविरोधी षड्यंत्र सातत्याने राबवण्यात येत आहे, हे लक्षात घ्या ! अयोध्येतील श्रीराममंदिर उद्ध्वस्त करून तेथे स्वतःच्या नावाने ढाचा उभारणारा बाबरच होता. ५ शतकांच्या प्रदीर्घ आणि रक्तरंजित संघर्षानंतर अयोध्येत भव्य श्रीराममंदिराची उभारणी होत आहे. असे असतांना आक्रमणकारी बाबराचे उदात्तीकरण करणे, हा केवळ हिंदुद्रोहच नाही, तर राष्ट्रघात आहे, हे लक्षात घ्या ! याचा भारतभरातील हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध करायला हवा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

‘ओटीटी’ म्हणजे काय ?

‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ ! आस्थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा म्हणजे ‘ओटीटी’ असेही म्हणता येईल. ओटीटीद्वारे दर्शक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात.

‘द एम्पायर’च्या विरोधातील ट्विटर ट्रेंड्स अग्रस्थानी !

‘द एम्पायर’ वेब सिरीज अयोध्येतील श्रीराममंदिराचा विध्वंस करणार्‍या इस्लामी आक्रमक बाबराचे उदात्तीकरण करत असल्याने त्याच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. ट्विटरवरून वेब सिरीजचा निषेध करण्यासाठी विविध ट्रेंड्स करण्यात आले. भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांनी २७ ऑगस्टला सकाळी चालवलेला #UninstallHotstar हा हॅशटॅग ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावर होता, तर सायंकाळी करण्यात आलेला #BanTheEmpireSeries ट्रेंड दुसर्‍या क्रमांकापर्यंत पोचला. या ट्रेंड्समध्ये अनुक्रमे ४७ सहस्रांहून अधिक आणि १८ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.

भारतभर ‘द एम्पायर’ला विरोध !

१. हिंदुधर्मप्रेमी दूरचित्रवाहिनी (टीव्ही), लॅपटॉप (भ्रमणसंगणक) आणि भ्रमणभाष संच यांमध्ये ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’चे ॲप ‘अनइन्स्टॉल’ (काढून टाकत) करत आहेत.

२. ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ला ‘द एम्पायर’चा विरोध करणारा निषेधाचा ई-मेल पाठवत आहेत. ई-मेलमध्ये ॲप ‘अनइन्स्टॉल’ करत असल्याची माहितीही नोंद करत आहेत.

निषेधासाठी ई-मेल पत्ता : [email protected]

राष्ट्रघातकी आणि हिंदुविरोधी घटनांचा निषेध संयत मार्गाने करा !

हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कुणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *