भारतातील हिंदूंचे आणि साधू-संतांचे रक्षण न करणारे शासन बांगलादेशमधील हिंदूंचे आणि अन् साधू-संतांचे रक्षण कसे करणार ?
परदेशातील विविध वार्ता दाखवणारी भारतीय प्रसारमाध्यमे पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार मात्र दडपतात !
ढाका : बांगलादेशच्या गोपालगंज जिल्ह्यातील तुंगीपारा येथे मुसलमान जिहाद्यांनी एका हिंदु साधूची चाकूने भोसकून हत्या केली. या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी शरिफुल शेख (वय २५ वर्षे) नावाच्या मुसलमान युवकाला अटक केली आहे. या साधूंचे नाव परमानंद राव असे असून त्यांनी कौटुंबिक जीवनाचा त्याग करून धर्मकार्य आणि समाजकार्य यांसाठी स्वत:ला वाहून घेतले होते. हे साधू आपल्या भागात विविध कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा प्रसार करत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. ठाकूर रसराज रॉय यांचे ते शिष्य होते. (बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! हिंदूंनो, भारतात तुम्हाला असहिष्णु ठरवणारे तथाकथित पुरोगामी इस्लामी राष्ट्रात तुमच्यावर आक्रमण करणार्यांच्या विरोधात तोंडही उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. साधू परमानंद जवळच्या गिमादंगा गावातून परतत असतांना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शरिफुल याने त्यांच्यावर चाकूने आक्रमण केले. त्याने साधूच्या पोटात चाकू खुपसून त्यांना गंभीररित्या घायाळ केले, असे साधू परमानंद यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले.
२. साधू परमानंद यांना गंभीर स्थितीत ढाका येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
३. साधू परमानंद यांच्या हिंदु धर्मप्रचाराला शरिफुल याचा पूर्वीपासून विरोध होता. शरिफुल याने त्यांच्या धर्म प्रचारकार्याला बर्याच वेळा आक्षेपही घेतला होता.
४. साधू परमानंद यांचे पुत्र दयाल रॉय यांनी या प्रकरणी शरिफुल शेख याच्यासह तीन मुसलमान आरोपींच्या विरोधात तुंगिपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात