Menu Close

(म्हणे) ‘भारताची दोन भागांत फाळणी करून एक भाग ख्रिस्त्यांना द्या !’ – आंध्रप्रदेशातील फुटीरतावादी पाद्य्राची मागणी

  • आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस्.आर्. काँग्रेसचे ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सत्तेवर असतांना या फुटीरतावादी पाद्य्राची मागणी सत्यात उतरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अत्यावश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • भारतात वासनांध, तसेच हिंदुद्वेषी पाद्री आहेत. आता त्यात फुटीरतावादी पाद्य्रांचीही भर पडली आहे ! अशी मागणी करणार्‍या पाद्य्राविषयी तथाकथित निधर्मीवादी, सर्वधर्मसमभाववाले काही बोलतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • या पाद्य्राला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून त्याला आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • भारताची फाळणी करण्याची भाषा करणाऱ्या पाद्र्यांच्या मागे कोण आहेत ?, याचा शोध घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

डावीकडे बायबल ओपन यूनिव्हर्सिटी इंटरनॅशनल’चे उप संचालक पाद्री उपेंद्र राव

अमरावती (आंध्रप्रदेश) – ऑल इंडिया ट्रू क्रिश्‍चियन कौन्सिलच्या वतीने आम्ही मागणी करतो की, भारताची २ भागांमध्ये फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे. फाळणी केल्यानंतर आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, असे फुटिरतावादी विधान ‘बायबल ओपन यूनिव्हर्सिटी इंटरनॅशनल’चे उप संचालक पाद्री उपेंद्र राव यांनी केले आहे. (‘बाटगे ख्रिस्ती हे पोपपेक्षाही कडवे असतात’, असे म्हटले जाते. त्याचे हे उदाहरण होय ! ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते. त्याचीच प्रचीती येथे मिळत आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ ‘एस्.सी/एस्.टी राइट्स फोरम’ने (‘अनुसूचित जाती-जमाती हक्क मंचा’ने) त्याच्या ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. (भारतात अनुसूचीत जाती-जमातीच्या हिंदूंना ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. या समाजाच्या उत्कर्षाच्या नावाखाली ‘एस्.सी/एस्.टी राइट्स फोरम’ सारख्या संघटना कसल्या कारवाया करतात, याकडे सरकारी यंत्रणांनी लक्ष ठेवणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) पाद्री उपेंद्र राव तेलंगाणा आणि महाराष्ट्र येथील ‘अखिल भारतीय खरे ख्रिस्ती परिषदे’चे राज्य अध्यक्षही आहेत.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *