Menu Close

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण जयंती साजरी करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमण !

धर्मांधांनी श्रीकृष्णाची मूर्ती तोडली !

  • पाकचे पंतप्रधान पाकमधील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्याच्या मोठमोठ्या बाता मारतात, तसेच भारतातील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या कथित अत्याचारांवरून उर बडवत असतात. त्यांना अशा घटना का रोखता येत नाहीत ? हे त्यांनी सांगायला हवे ! – संपादकीय दैनिक सनातन प्रभात

  • पाकमधील हिंदूंच्या मंदिरांचे आणि हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने पाकच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे ! – संपादकीय दैनिक सनातन प्रभात

  • भारतात जमावाच्या मारहाणीत एक अखलाख नावाचा मुसलमान मारला गेल्यानंतर उर बडवणारे जगभरातील मानवतावादी कार्यकर्ते पाकिस्तानमध्ये सहस्रो हिंदूंच्या हत्या होत असतांना आणि त्यांची मंदिरे उद्ध्वस्त होत असतांना शांत रहातात. यावरून त्यांना मानवाधिकाराविषयी असलेले प्रेम ढोंगी असून त्यांना केवळ हिंदुद्वेषाचा कंड शमवायचा असतो, असे लक्षात येते ! – संपादकीय दैनिक सनातन प्रभात

  • जगभरातील इस्लामी देशांतील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

श्रीकृष्णाच्या मूर्तीची झालेली तोडफोड
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सिंधमधील संघर जिल्ह्यातील खिप्रो या भागामध्ये धर्मांधांनी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच श्रीकृष्ण मंदिरांत पूजा करणार्‍या हिंदूंवर आक्रमण करत त्यांना मारहाण केली. तसेच येथील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचीही तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत; मात्र आतापर्यंत कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही, अशी माहिती पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारासाठी कार्यरत असलेले राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून दिली.

१. सामाजिक माध्यमांतून या तोडफोडीची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. त्यामध्ये हिंदु  भाविकांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे.

२. ‘द राईज’ या वृत्तसंस्थेच्या संपादिका आणि पत्रकार विंगास यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘खिप्रोमध्ये श्रीकृष्ण जयंतीला काही लोकांनी तोडफोड केली. या घटनेतील दोषींना शिक्षा मिळेल का ?’ असा प्रश्‍न विचारला आहे.

३. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदूंना मारहाण करणे किंवा मंदिरांची तोडफोड होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. या मासाच्या प्रारंभी लाहोरपासून सुमारे ५९० किलोमीटर अंतरावर रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरामध्ये शकडो धर्मांधांनी श्री गणपति मंदिराची तोडफोड केली होती.

४. वर्ष २०२० मध्ये सिंधमधील थारपारकर जिल्ह्यातील नागारपारकर येथे धर्मांधांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती, तसेच सप्टेंबर २०२० मध्ये याच प्रांतात बादिन जिल्ह्यामध्ये एका मंदिराची तोडफोड करण्यात आली होती.

५. गेल्या वर्षी सिंधमध्ये माता रानी भटियानी मंदिर, गुरुद्वारा श्री जन्मस्थान, खैबर पख्तुनख्वामधील कराक येथील हिंदु मंदिरासह पाकिस्तानमधील अनेक मंदिरांवर आक्रमणे झाली आहेत.

६. मानवाधिकार संस्था ‘मूव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीस’च्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमध्ये प्रतिवर्षी १ सहस्रहून अधिक ख्रिस्ती आणि हिंदु महिला अन् मुली यांचे  अपहरण केले जाते. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून इस्लामी पद्धतीने त्यांचा विवाह लावून दिला  जातो. पीडित महिला आणि मुली यांचे सरासरी वय १२ ते २५ इतके असते.

पाकमध्ये मुसलमानेतरांच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना शिक्षा होत नाही ! – मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन

याविषयी भारतातील मुसलमान संघटना, त्यांचे नेते, मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष आदी तोंड उघडतील का ? – संपादकीय दैनिक सनातन प्रभात

मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन

या घटनेविषयी मानवाधिकार कार्यकर्ते अधिवक्ता राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून  म्हटले की, इस्लामच्या विरोधात ईशनिंदेचे खोटे आरोप केल्यानंतरही सामूहिक हत्या किंवा मृत्यूदंड दिला जातो; परंतु मुसलमानेतरांच्या देवतांचा अवमान केल्यास कोणतीच शिक्षा होत नाही.’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *