Menu Close

(म्हणे) ‘काश्मीरला इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा !’ – अल् कायदाचे तालिबानला आवाहन

  • आतंकवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना धर्म असतो अन् त्यामुळेच ते इस्लामसाठी एकत्र येतात, हे या आवाहनातून सिद्ध होते. अशा आतंकवाद्यांना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अशा कितीही इस्लामी आतंकवादी संघटना एकत्र आल्या, तरी त्यांना तो कधीही मिळवता येणार नाही, असे भारताने स्पष्टपणे सांगितले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • असे किती हिंदू एखाद्या गोष्टीत विजय मिळाल्यावर म्हणतात ? काही हिंदूंनी अशा प्रकारे देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तर धर्मनिरपेक्ष भारतात तीही धर्मांधता ठरते, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्यानंतर जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाने तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काश्मीरसहित अन्य इस्लामी भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करण्याचे आवाहन केले आहे.

तालिबानने दिलेल्या संदेशाच्या शीर्षकात म्हटले आहे, ‘अफगाणिस्तानमधील इस्लामी समाजाला अल्लाने दिलेल्या स्वातंत्र्यासाठी शुभेच्छा !’ पुढे लिहिले आहे, ‘हे अल्ला, सोमालिया, येमेन, काश्मीर आणि जगातील अन्य इस्लामी भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त कर. जगभरातील मुसलमान बंदीवानांना मुक्त कर. सर्वशक्तीमान अल्लाने अमेरिकाला अपमानित केले आणि पराजित केले. सर्व घटनांमुळे सिद्ध होते की, केवळ जिहाद (धर्मयुद्ध) करूनच विजय प्राप्त होतो. अल्लाच्या साहाय्याने मिळालेला हा विजय मुसलमानांना पाश्‍चात्त्यांच्या गुलामगिरीपासून वाचण्याचा मार्ग दाखवील.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *