Menu Close

जगातील १३ देश, तसेच भारतातील २३ राज्ये आणि ४०० शहरे अन् गावे येथील हिंदूंचा आंदोलनात सहभाग; २५० ठिकाणांहून सरकारला निवेदने !

‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ कार्यक्रमाच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुंबई – ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन जागतिक स्तरावर करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे हे मोठे षड्यंत्र पहाता या कार्यक्रमाला भारत सरकारने विरोध करावा, तसेच कार्यक्रमात सहभागी भारतीय वक्त्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जगभरातील हिंदूंनी आंदोलन केले. या आंतरराष्ट्रीय आंदोलनात १३ देशांतून, तसेच भारताच्या २३ राज्यांतील ४०० शहरे अन् गावे येथील हिंदूंनी सहभाग घेतला. तसेच या आंदोलनाचा भाग म्हणून ४४ ठिकाणी प्रत्यक्ष, तर २०६ ठिकाणांहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना ‘ऑनलाईन’ निवेदने पाठवण्यात आली. या आंदोलनामध्ये हिंदु जनजागृती समितीसह देशभरातील ३२ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु धर्माभिमानी यांचा सहभाग होता.

‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ कार्यक्रमाच्या विरोधात जगभरातून प्रतिक्रिया येत असून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. या कार्यक्रमाला भारतातून साम्यवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्त्या कविता कृष्णन्, आनंद पटवर्धन, नलिनी सुंदर, नेहा दीक्षित, मीना कंदासामी आदी वक्ते संबोधित करणार असल्याचे, तसेच जगभरातील ४० हून अधिक विद्यापिठेही सहभागी असल्याचा दावा आयोजकांनी केला होता; मात्र जगभरातील हिंदूंच्या जोरदार विरोधामुळे यांतील अनेक विद्यापिठांनी ‘आमचा या कार्यक्रमाशी संबंध नाही’, असे घोषित करून या कार्यक्रमातून माघार घेतली आहे.

‘ट्विटर’वरूनही ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या कार्यक्रमाला जोरदार विरोध !

‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाला ‘ट्विटर ट्रेंड’द्वारेही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचे दिसून आले. या वेळी भारतासह अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, कतार, इंडोनेशिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आदी देशांतील हिंदूंनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी #DGH_Panelists_Hindu_Haters या ‘हॅशटॅग’चा वापर करून ८१ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. परिणामी ‘ट्विटर’वर हा हॅशटॅग प्रथम स्थानावर होता. या हिंदुविरोधी कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने तिच्या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन पिटीशन’ (याचिका) ठेवली आहे. याद्वारे आतापर्यंत २ सहस्र ७५० हून अधिक लोकांनी ई-मेलच्या माध्यमातून सहभाग घेतला. ही याचिका http://HinduJagruti.org/protest-dgh या मार्गिकेवर उपलब्ध असून अधिकाधिक हिंदूंनी यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही समितीने केले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *