हिंदु जनजागृती समितीचे सांगली, ईश्वरपूर आणि पलूस येथे निवेदन
सांगली – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली, ईश्वरपूर आणि पलूस येथे निवेदन देण्यात आले. सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन पवार आणि श्री. कृष्णा यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई अन् श्री. नारायण मेणकर उपस्थित होते.
पलूस येथे तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री विजय पाटील, सत्यजित पाटील, शरद पाटील, हिंदु जनजागृती समितीचे भीमराव खोत आणि श्री. शशिकांत जोशी उपस्थित होते. ईश्वरपूर येथे नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. गौरव चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष कुंभार उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचे तहसीलदारांना निवेदन
कागल (जिल्हा कोल्हापूर) – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना ३ सप्टेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे कागल उपशहरप्रमुख श्री. प्रभाकर थोरात, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर आणि श्री. प्रदीप महाडिक, भारतीय किसान संघाचे कागल तालुकाप्रमुख श्री. बाबय्या स्वामी, बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी आणि श्री. श्रेयस निकम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
अंबड – येथील नायब तहसीलदार डी.एन्. पोटे यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जागरण मंचचे प्रांत संयोजक अंबादास आंबोरे आणि हिंदु जनजागृती समितीचे रवींद्र अंबिलवादे, अजय देशमुख, जगदीश बियाणी इत्यादी उपस्थित होते.