धर्मनिरपेक्ष देशामध्ये धार्मिक कृती करण्यासाठी विधानसभेची खोली देणे, हा राज्यघटनेचा अवमान आहे. याचा आता निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी विरोध का करत नाहीत ? हिंदूंना पूजा करण्यासाठी अशी खोली भाजपशासित राज्यात सरकारकडून देण्यात आली असती, तर या तथाकथित निधर्मीवाद्यांनी राज्यघटनेच्या नावाखाली आकाशपाताळ एक केले असते !
रांची (झारखंड) – झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून विधानसभेमध्ये नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली आरक्षित करण्यात आली आहे. (भविष्यात राज्य सरकारने विधानसभेच्या परिसरात मशीद बांधून दिल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) या संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून आदेश देण्यात आला आहे. भाजपकडून यावर टीका करण्यात आली आहे.