हिंदु जनजागृती समितीकडून ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घेण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !
मुंबई – श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाविषयी अधिक माहिती व्हावी, यासाठी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित २५ प्रश्न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून घेण्यात आली. ‘जीवनात आनंद कसा मिळवावा ?’, हे विविध लीलांच्या माध्यमातून शिकवले. याविषयी माहितीही सध्याच्या युवा पिढीला मिळण्याच्या दृष्टीनेही ही प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरली.
या उपक्रमाचा मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आणि मल्ल्याळम् या भाषांतील १५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला, तर १ सहस्र ५७१ जिज्ञासूंना २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.