तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यावर त्याच्या क्रूरतेचे एकेक किस्से बाहेर येऊ लागले आहेत. तालिबानने अफगाणी नागरिकांना घरातील १२ वर्षांवरील मुली आणि महिला यांची माहिती स्थानिक तालिबानी प्रमुखांकडे देण्यास सांगितले आहे. ‘या माहितीचे पुढे तालिबानी काय करणार ?’ याचा अंदाज सूज्ञ व्यक्ती सहज लावू शकते. सातत्याने विधाने पालटण्यामध्ये तालिबानी निष्णात आहेत. तालिबान्यांनी अफगाणी महिलांचे तालिबानी आतंकवाद्यांसमवेत निकाह लावण्याचे घोषित केले. तसेच ‘महिलांनी घरातील पुरुषांविना बाहेर फिरायचे नाही’, ‘शिक्षण घ्यायचे नाही’ अशी विविध बंधने घातली. पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवल्यावर सोज्वळ बनून ‘महिलांना शिक्षण घेता येईल’, असे सांगितले. तालिबानच्या प्रमुखाची मुलाखत घेतलेल्या एका अफगाणी वृत्तवाहिनीच्या निवेदिकेला देश सोडून पळून जाण्याची पाळी आली. वृत्तनिवेदक बातम्या सांगतांना त्याच्या मागे बंदूकधारी उभे असतात आणि त्याला अथवा तिला तालिबानचे कौतुक करणार्या, प्रशंसा करणार्या बातम्या सांगाव्या लागतात, असे चित्र आहे. महिलांना बंदी बनवून त्यांची विक्री चालू झाल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.
हिंदु स्त्रियांवर अत्याचार !
तालिबानी आतंकवाद्यांना इस्लामी राज्य आणण्याची मनीषा आहे आणि त्यांनी त्यांचा सर्वाेच्च नेता म्हणून एका मौलानाची नियुक्तीही केली आहे. आज भारताचा विचार केला, तर वर्ष ७१२ मध्ये भारतावर महंमद बिन कासिम याने प्रथम आक्रमण केले. त्यानंतर भारतावर खिलजी, बाबर, तैमूर, अब्दाली अशा इस्लामी आक्रमकांची आक्रमणे सातत्याने होत राहिली. या इस्लामी आक्रमकांचे लक्ष्य हिंदूंची मंदिरे, संपत्ती, धन-धान्य आणि हिंदु स्त्रिया हेच राहिले. हिंदु स्त्री मग ती राणी, राजकन्या, सामान्य मुलगी असो अथवा विधवा महिला, या आक्रमकांच्या लेखी त्या काफिरांच्या स्त्रियाच ! परिणामी त्या काळात हिंदु स्त्रियांचे जीवन नरकासमान होते. धर्मांध सत्ताधीश, त्यांचे सरदार अथवा सैनिक कुणाही हिंदु मुलीचे कधीही अपहरण करत आणि तिला जनानखान्यात डांबून तिच्यावर अत्याचार करत. काही आक्रमकांनी प्रत्येक आक्रमणाच्या वेळी सोने-नाणे यांसह शेकडो हिंदु स्त्रियांना त्यांच्या प्रदेशात पळवून नेले. अफगाणिस्तानमध्ये आजही ती जागा आहे, जेथे पळवून आणलेल्या हिंदु स्त्रियांची विक्री केली जाई. एका लेखकाच्या मते मध्य पूर्वेतील देशातील बहुसंख्य लोकसंख्या ही पळवून आणलेल्या हिंदु स्त्रियांच्या अनौरस संततीपासून निर्माण झाली आहे.
जौहरचे कारण !
हिंदु स्त्रियांची अशी भयानक परिस्थिती असल्यामुळे स्वत:च्या लेकीची धर्मांधांकडून विटंबना होण्याआधीच तिचा पिता मुलीचे वर्ष ८ ते १२ मध्येच म्हणजेच अल्प वयात लग्न लावून देत असे, म्हणजे ती सुरक्षित राहील; कारण अविवाहित स्त्रियांवर धर्मांधांचे अधिक लक्ष होते. पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या हिंदु स्त्रियांच्या पुढच्या दायित्वाची कुटुंबियांनाही भीती असे. अशा वेळी हिंदु स्त्री धर्मांधांकडून त्रास नको म्हणून पतीच्या चित्तेवर उडी घेऊन सती जाऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवत असे. राजे आणि महाराजे यांच्या काळात राजे आणि त्यांचे सैन्य रणांगणांवर मोगलांशी लढण्यासाठी गेल्यावर, जेव्हा स्त्रियांना त्यांचे पती आता घरी जिवंत परत येणार नाहीत, याची निश्चिती होई, तेव्हा शीलरक्षणासाठी श्लोक म्हणत सामूहिकरित्या अग्नीप्रवेश करत. त्यालाच ‘जौहर’ असे म्हटले जाते. राजस्थानमध्ये असे जौहर अनेक वेळा झाले आहेत. खिलजीच्या आक्रमणाच्या वेळी राणी पद्मावतीने ११ सहस्र स्त्रियांसह केलेला जौहर प्रसिद्ध आहे.
पडदा प्रथेचे मूळ
हिंदु स्त्रियांमध्ये आढळणार्या पडदा प्रथेचे मूळही या आक्रमकांपासून रक्षण होणे हेच आहे. अकबराच्या काळात तो सुंदर हिंदु स्त्रियांचा मीना बाजार भरवत असे. अकबर रस्त्यावरून जात असतांना एखादी स्त्री त्याला आवडल्यावर बळजोरीने तिची अकबराच्या जनानखान्यात रवानगी केली जायची. अकबराच्या जनानखान्यात अशा ५ सहस्र स्त्रिया होत्या, असा उल्लेख आहे. या स्त्रियांचे जीवन अंधारमय होते. धर्मांधांच्या दृष्टीस पडू नये, यासाठी स्त्रिया पडदा धरत. ही प्रथा आजही राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथील काही भागांत पाळली जाते. जिहादी आतंकवादी स्त्रियांच्या मृतदेहाशीही संबंध प्रस्थापित करतात, असेही वृत्त होते. पाकमधील महिलेचा मृतदेह दफन केल्यावर तिचे कुटुंबीय काही दिवस तेथे पहारा करतात, जेणेकरून तिचा मृतदेह बाहेर काढून त्यावर कुणी अत्याचार करू नये. या उदाहरणातून ‘हिंदु स्त्रिया जौहर करून अग्नीप्रवेश का करायच्या ?’ हे लक्षात येते. इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या याझिदी महिलांनी सांगितलेले त्यांच्यावर गुदरलेले प्रसंग हे अंगावर काटा आणणारे आहेत. या महिलांवर धर्मांध आतंकवादी कित्येकदा सामूहिक बलात्कार करत, नंतर त्यांची ‘सेक्स स्लेव’ (वासना शमवण्यासाठी गुलाम) म्हणून विक्री करण्यात येत असे. त्यांना अनेक दिवस जेवण देण्यात येत नसे, तर काही वेळा मानवी मांस शिजवून देण्यात आले. या महिलांना खरेदी करणार्या धर्मांधांकडूनही महिलांवर अनन्वित अत्याचार झाले. त्यातून स्वत:ची सुटका करून पळून आलेल्या या महिला मानसिक धक्के आणि शारीरिक दुखापती यांतून कसेबसे सावरून विविध सामाजिक माध्यमांतून अत्याचारांची भीषणता जगाला ओरडून सांगत आहेत. ‘हिंदूंमध्ये सतीप्रथा होती, बालविवाह होते म्हणजे हिंदु धर्म बुरसटलेला होता’, अशी जी पाश्चात्त्यांची मांडणी आहे, तीच किती हास्यास्पद आहे, हे या प्रथांच्या कारणाच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येते. त्या त्या परिस्थितीत हिंदु धर्मधुरिणांच्या मार्गदर्शनाखाली अशा काही प्रथा चालू झाल्या, त्यांचा उद्देश लक्षात घेणे आवश्यक आहे. स्त्रीला देवीसमान मानून येनकेन प्रकारेण तिचे संरक्षण करण्याचे दायित्व घेणारा हिंदु धर्म आणि समाज हा एकमेवाद्वितीयच आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात