Menu Close

नागपूर येथे बुरखाधारी महिलांनी हिंदु तरुणींना घालायला लावला हिजाब !

  • विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वेळीच खडसावल्यावर बुरखाधारी महिलांचे पलायन

  • पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

महाराष्ट्राच्या उपराजधानीत असा प्रकार घडणे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 

नागपूर – येथील ‘सिव्हिल लाईन्स’ भागातील ‘वॉकर्स स्ट्रीट’वर ४ सप्टेंबर या दिवशी पहाटे ५ ते सकाळी ६ या वेळेत काही बुरखाधारी महिला येणार्‍या-जाणार्‍या हिंदु तरुणींना हेरून पत्रकांचे वितरण करत होत्या, तसेच त्यांना हिजाब घालण्यास सांगत होत्या, असा धक्कादायक प्रकार समोर आला. काही जागरूक नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ याची माहिती विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिली. (धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्‍या नागरिकांचे अभिनंदन ! – संपादक दैनिक सनातन प्रभात ) कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येऊन बुरखाधारी महिलांना खडसावले. (बुरखाधारी महिलांना वेळीच खडसावून धर्महानी रोखणार्‍या विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक दैनिक सनातन प्रभात ) प्रकरण अंगाशी येईल, हे लक्षात येताच बुरखाधारी महिला तेथून काही अंतरावर उभ्या असलेल्या काही युवकांच्या दुचाकी वाहनावर बसून पळून गेल्या.

१. विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी खडसावल्यावर बुरखाधारी महिलांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच साळसूदपणाचा आव आणत म्हणाल्या, ‘‘जागतिक हिजाब दिवस’ असल्याने आम्ही हिजाबचे वाटप करत आहोत. आम्ही ज्यांना हिजाब दिला, त्यांनी तो स्वतःहून घातला.’’

२. काही वेळाने त्या महिलांनी विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यावरच आरोप करण्यास प्रारंभ केला. (धर्मांधांचा कावेबाजपणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात ) कार्यकर्त्यांनी त्या महिलांकडून कुराणमध्ये हिजाबविषयी माहिती असलेली पत्रकेही कह्यात घेतली.

३. त्या महिलांची ओळख पटू शकली नाही; मात्र नागरिकांनी ज्या युवकांसमवेत महिला पळून गेल्या, त्यांच्या दुचाकी वाहनांचे क्रमांक लिहून घेतले.

४. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

५. ‘सार्वजनिक ठिकाणी बळजोरीने हिंदु तरुणींना हिजाब घालायला लावणे, हा एकप्रकारे धर्मांतराच्या षड्यंत्राचाच प्रकार असून हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून दोषी व्यक्ती आणि त्यांचे सूत्रधार यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि धर्मजागरण मंच या संघटनांसह काही नागरिकांनी केली आहे.

हिजाब घालून हिंदु धर्मीय तरुणींनी ‘सेल्फी’ काढले !

यावरून हिंदु तरुणींना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते ! आताच जर धर्मशिक्षण दिले नाही, तर पुढे त्या हिजाब घालून फिरू लागल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 

बुरखाधारी महिलांनी हिजाब दिल्यावर काही हिंदु धर्मीय तरुणींनी तो घालून ‘सेल्फी’ (भ्रमणभाषवर स्वतःच स्वतःचे छायाचित्र काढणे) काढले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *