Menu Close

अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायद्यानुसार कारभार चालणार ! – तालिबानची घोषणा

लोकशाहीवर ‘प्रेम’ करणार्‍या भारतातील तालिबानीप्रेमींना अफगाणिस्तानमधील शरीयतनुसार चालणारा कारभार मात्र आवडेल आणि ते त्याचे समर्थनच करतील ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

मुल्ला महंमद हसन अखुंद आणि मुल्ला अब्दुल गनी बरादर

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने अखेर ७ सप्टेंबरला सायंकाळी उशिरा त्याच्या सरकारची स्थापना केली. यात ३० हून अधिक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानचा पंतप्रधान म्हणून मुल्ला महंमद हसन अखुंद असणार आहे, तर मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि अब्दुल सलाम हनाफी हे दोघे उपपंतप्रधान आहेत. हक्कानी नेटवर्कच्या सिराजुद्दीन हक्कानी याला गृहमंत्री बनवण्यात आले आहे. मुल्ला याकूब संरक्षणमंत्री, तर अब्बास स्टेनेकझाई याला उपपरराष्ट्रमंत्री करण्यात आले आहे. सरकारच्या स्थापनेनंतर सरकारकडून करण्यात आलेल्या निवेदनामध्ये अफगाणिस्तानमध्ये शरीयतनुसार कारभार करण्यात येईल, असे घोषित करण्यात आले आहे. तसेच देशात निदर्शने आणि आंदोलने करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. (म्हणजेच अफगाणिस्तानमध्ये आता लोकशाहीनुसार काहीच नसणार ! भारतातील तालिबानीप्रेमी भारतात लोकशाहीच्या नावाखालीच तालिबानचे समर्थन करत आहेत. एरव्हीही ते लोकशाहीमुळेच विरोधी विचार व्यक्त करत असतात, त्यामुळे आता ते तालिबानी सरकारच्या या फतव्याविषयी तोंड उघडतील का ? अफगाणिस्तानमधील नागरिकांना त्यांचे सरकारविरोधी विचार मांडण्याच्या अधिकाराचे रक्षण होण्यासाठी आवाज उठवतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात )

तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्लाह अखुंदजादा याने सांगितले की, तालिबान इस्लामला पूरक असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदे, करार आणि दायित्व यांच्यानुसार सत्ता करील.

(म्हणे) ‘मंत्र्यांसाठी पी.एच्डी., एम्.ए. आदी शैक्षणिक पदव्यांची आवश्यकता नाही !’ – तालिबानी शिक्षणमंत्री

असा शिक्षणमंत्री असणार्‍या तालिबानचे सरकार आणि त्यांचा कारभार कसा असणार, हे स्पष्ट होते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

शेख मौलवी नुराल्लाह मुनीर

पी.एच्डी. यांसारखी कोणतीही पदवी आज फारशी महत्त्वाची नाही. तुम्ही पाहू शकता की, मुल्ला आणि सत्तेत असणार्‍या तालिबानी नेत्यांकडे पी.एच्डी. किंवा एम्.ए. किंवा अगदी शैक्षणिक शिक्षणही नाही; पण ते आज येथील सर्वेसर्वा आहेत, असे विधान तालिबानच्या नवीन सरकारमधील शिक्षणमंत्री शेख मौलवी नुराल्लाह मुनीर याने केले आहे. ‘पदव्या म्हणजे सर्वांत उच्च आहेत’ असे समजण्याचे कारण नाही’, असेही मुनीर याने म्हटले आहे.

कोण आहे तालिबानचा पंतप्रधान मुल्ला अखुंद ?
मुल्ला महंमद हसन अखुंद हा सध्या तालिबानकडून घेण्यात येणार्‍या महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी अंतिम दायित्व असणार्‍या ‘रहाबारी शूरा’ या नेत्यांच्या परिषदेचा प्रमुख आहे. अखुंद याचा जन्म कंदहारमध्ये झाला असून नंतर तालिबानच्या सशस्त्र लढाईचे नेतृत्व करणार्‍या गटाच्या सहसंस्थापकांपैकी तो एक आहे.

अफगाणिस्तानच्या मंत्रीमंडळात सर्वजण मोठे आतंकवादी !

१. तालिबानचा प्रमुख नेता असलेल्या अखुंदजादा हा २० वर्षांपूर्वी तालिबानच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होता. सध्या त्याचे नाव संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये आहे.

२. मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबानच्या राजकीय शाखेचा प्रमुख आहे. सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानमधून माघार घेतली आणि अस्थिरता, गोंधळ, भ्रष्टाचार अशा वातावरणात मुल्ला ओमर आणि मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी तालिबानची स्थापना केली. वर्ष २०१० मध्ये बरादर याला पाकिस्तानच्या कराचीमध्ये अटक करण्यात आली होती आणि वर्ष २०१८ मध्ये त्याची सुटका केली गेली.

३. गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी संयुक्त राष्ट्रांच्या सूचीमध्ये असून त्याला ‘जिवंत अथवा मृत पकडून देणार्‍याला ५ मिलियन डॉलरचे (अनुमाने ३७ कोटी रुपयांचे) बक्षीस म्हणून देण्यात येईल’, असे अमेरिकेने घोषित केले आहे. अमेरिकेच्या दृष्टीने सिराजुद्दीन हक्कानी पसार आहे. वर्ष २००८ मध्ये काबुलच्या हॉटेलमध्ये बाँबस्फोट झाला होता. त्यात ६ जणांचा बळी गेला होता. त्यात काही अमेरिकी नागरिकही होते. हा स्फोट सिराजुद्दीन हक्कानी यानेच घडवल्याचा आरोप आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *