Menu Close

तालिबानी सत्ता आणि हिंदु राष्ट्र !

जगाला सनातन धर्माचे अलौकिकत्व अनुभवता येण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

तालिबान्यांच्या सरकार स्थापनेमुळे शरियतच्या कार्यवाहीला मिळणार मोकळे रान ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

मुल्ला महंमद हसन अखुंद आणि इतर

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर नियंत्रण मिळवल्याच्या २२ दिवसांनंतर तालिबानने अखेर त्याचे सरकार घोषित केले आहे. तेथील केंद्र सरकारला ‘अफगाणिस्तानची इस्लामी अमिरात’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुल्ला महंमद हसन अखुंद याला अफगाणिस्तानचे पंतप्रधान बनवण्यात आले आहे, तर मुल्ला अब्दुल घनी बरादर हा दोन उपपंतप्रधानांपैकी एक आहे. तालिबानच्या मंत्रीमंडळामध्ये एक महत्त्वपूर्ण नाव हे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी याचे आहे. तो अमेरिकेचा ‘मोस्ट वाँटेड’ जिहादी आतंकवादी असून अमेरिकेने त्याला पकडण्यासाठी यापूर्वीच तब्बल ३७ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. तालिबानचे हे अंतरिम सरकार असले, तरी यातून त्याचे आगामी सरकार आणि मंत्रीमंडळ यांचा अंदाज बांधता येईल.

तालिबानला ‘अधिकृत’ मोकळे रान !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

१९९० च्या दशकात अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता असतांना तेथील अफगाणी जनतेला प्रचंड हालअपेष्टा सोसाव्या लागल्या होत्या. तेथील लोकांसाठी काळाकुट्ट ठरलेल्या वर्ष १९९६ ते वर्ष २००१ या ५ वर्षांच्या कालावधीत तालिबानने शरियत कायद्याची कठोर कार्यवाही केली होती. १ लाख ६० सहस्र अफगाणी जनतेला अन्नपुरवठा न करणे, महिलांना नोकरी आणि शिक्षण घेण्यापासून परावृत्त करणे, बुरखा पद्धतीचे कठोरतेने पालन करणे, शरियतनुसार गुन्हा केलेल्यांना देहदंडापर्यंतच्या शिक्षा देणे या माध्यमांतून अफगाणी जनतेला वेठीस धरले होते. गेल्या मासात काबुलवर नियंत्रण मिळवल्यापासून लक्षावधी अफगाणी लोक देश सोडून पलायन करण्यासाठी जिवाचे रान करत असण्यामागील कारण म्हणजे भूतकाळातील या आठवणी आजही त्यांच्या मन:पटलावर ताज्या असल्याचेच द्योतक होय. ‘आताची तालिबानी सत्ता ही अफगाणी जनतेचे हित जोपासणारी असेल’, असे तालिबानच्या प्रवक्त्याने घोषित केले असले, तरी त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार ! तालिबानने त्याच क्रूर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास चालू केले आहे. जुलै २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानी सैन्यातील २२ नि:शस्त्र कमांडोंवर गोळीबार करून त्यांना ठार केले. ‘शरणागती पत्करणार्‍या अफगाणी सैनिकांना न मारता त्यांना सोडण्यात येईल’, अशी घोषणा करणार्‍या तालिबानचे हे कृत्य तो विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा आहे का ? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. काही आठवड्यांपूर्वी तालिबानने बदखशान आणि तखार या प्रांतांतील १५ वर्षांहून अधिक वयाच्या युवती अन् ४५ वर्षांखालील महिला यांची सूची सिद्ध करण्याचा आदेश तेथील धार्मिक नेत्यांना दिला. अशा युवती आणि महिला यांचा तालिबानच्या सैनिकांसाठी लैंगिक गुलाम (सेक्स स्लेव्ह) म्हणून वापरण्याचा यामागील वासनांध विचार आहे. तालिबानने देशातील गझनी प्रांतात काही दिवसांपूर्वी शिया मुसलमानांचा भरणा असलेल्या ‘हजरा’ समाजातील ९ लोकांची निर्घृण हत्या केली. त्यामुळे तालिबानच्या मानवाधिकारांचा सन्मान करणार्‍या घोषणांतील खोटारडेपणा लक्षात येतो. आतातर सरकार स्थापन झाले असल्याने इस्लामनुसार सत्ता हाकण्यासाठी तालिबानला ‘अधिकृत’ मोकळे रानच मिळाले आहे.

‘हिंदु राष्ट्र’ केव्हा ?

अफगाणिस्तानमधील इस्लामी आक्रमकांची कृत्ये पाहून भारतातील काही मंडळींनी भारतभूमीशी एकनिष्ठ असणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना तालिबान्यांच्या गटात बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे. ज्या प्रकारे ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणत जगाची दिशाभूल करणार्‍या ‘सेक्युलरी’ (निधर्मी) उपटसुंभांना १-२ आक्रमणांच्या प्रकरणांत हिंदूंना गोवून अटक केल्यावर ‘भगवा आतंकवादा’ची स्वप्ने पडू लागली होती, त्या प्रकारे हिंदुत्वनिष्ठांना ‘हिंदु तालिबानी’ म्हणत त्यांच्या विरोधात गरळ ओकण्यात येत आहे. ‘गोबेल्स नीती’चा कुटील वापर करत हिंदूंना धर्माचरण करण्यापासून परावृत्त करण्याचा या धर्मनिरपेक्षतावाद्यांचा नीच प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. सात्त्विक वेशभूषेपासून ते आध्यात्मिक स्तरावरील दिनचर्या यांचे पालन करण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदूंना ही मंडळी एकजात ‘हिंदु तालिबानी’ या नावाने हिणवतात, हे लक्षात घ्या ! ‘शांतीदूतां’चा पंथ आणि ईश्वरनिर्मित सनातन वैदिक हिंदु धर्म यांना समान पातळीवर आणणे म्हणजे एखादा गुंड अन् अत्युच्च पातळीचे संत यांना एक म्हटल्यासम होय. त्यामुळे हिंदु धर्माला ‘सैतान्यांचा धर्म’ संबोधणार्‍या पुरो(अधो)गामीरूपी वैचारिक दिवाळखोरांनाही त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी एकत्रित येणे काळाची आवश्यकता आहे.

त्यासमवेत सनातन धर्माचे सत्य स्वरूप समजून घेण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ‘ज्याच्या योगे मनुष्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होते, समाजव्यवस्था उत्तम रहाते, त्यास ‘धर्म’ असे म्हणतात’, ही आद्यशंकराचार्य यांनी सनातन धर्माची केलेली व्याख्या होय. अशा धर्माच्या आचरणाने मनुष्याचे सार्वत्रिक हित होते. चैतन्याचा मूळ स्रोत हा धर्मच आहे. त्यावर सर्व सृष्टी आधारित आहे. आज भारतासह जगाला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांचे मूळ कारण हे धर्म सोडून आचरण करण्यात सामावलेले आहे. त्यामुळेच धर्माधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने सर्व मानवजातीचे कल्याण होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या १ सहस्र ४०० वर्षांत लक्षावधी काफिरांना ठार करणार्‍या, असंख्य महिलांचे शील भ्रष्ट करणार्‍या आणि ‘मानवते’वर काळी छाया निर्माण करणार्‍यांचे वंशज असलेल्या तालिबान्यांनी जर आज अफगाणिस्तानवर सत्ता स्थापिली आहे, तर जगाला सनातन धर्माच्या अलौकिकत्वाचा अनुभव करून देण्यासाठी ‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) ही शिकवण रुजलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आत्यंतिक अभिमानाने पुढे सरसावले पाहिजे. त्यासाठी सर्व स्तरांतील हिंदूंनी त्यांच्या क्षमतेनुसार या कार्यास हातभार लावायला हवा, हे लक्षात घ्या !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *