Menu Close

शिरूर (जिल्हा पुणे) येथील अतिक्रमण करून बांधलेल्या धार्मिक स्थळांविरोधात तक्रारी करूनही प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

विद्यार्थ्यांना भोंग्यांचा पुष्कळ उपद्रव !

वाहतुकीस मोठा अडथळा !

‘हिंदु’ मैदानाचे इस्लामी नामकरण !

  • अवैध अतिक्रमणांविरुद्ध तक्रारी देऊनही कारवाई होत नसेल, तर जनतेने कुणाकडे पहावे ? गेल्या ७ दशकांतील काँग्रेसने केलेल्या मुसलमानांच्या तुष्टीकरणाचेच हे फलित आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • पोलीस अवैध अतिक्रमणांवर आणि त्यांवरील भोंग्यांवर कारवाई करत नाहीत, याचा अर्थ त्यांनाही धर्मांधांची भीती आहे कि त्यांच्यावर राजकीय दबाव आहे ?, हे जनतेसमोर आले पाहिजे. – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • देशभरातील धर्मांधांची अवैध अतिक्रमणे संपवण्यासाठी छत्रपतींप्रमाणे हिंदु राष्ट्रच हवे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

धर्मांधांनी पटांगणावर अतिक्रमण करून बांधलेले प्रार्थनास्थळ
वर्तुळात दाखवलेले लाटेआळी येथे अतिक्रमण करून बांधलेले प्रार्थनास्थळ

शिरूर (जिल्हा पुणे) – येथे बर्‍याच ठिकाणी, गल्लीबोळात आणि पटांगणातही धर्मांधांनी अतिक्रमण करून अवैधरित्या त्यांची धार्मिक स्थळे उभारली आहेत. या संदर्भात काही हिंदुत्वनिष्ठांनी आवाज उठवला आहे, तसेच प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी वगळता अन्य कुणी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन यांनी या संदर्भात कारवाईच्या दृष्टीने काहीही केलेले नाही.

१. येथील लाटेआळी, शनि मंदिर, मुंबई बाजार, तसेच सरकारी जागेत आणि रस्त्याच्या कडेनेही धर्मांधांनी अवैध धार्मिक स्थळे बांधून अतिक्रमण केले आहे.

२. लाटेआळी येथील अतिक्रमणाच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्) नोंद झाला असून एका मुसलमान व्यक्तीने केलेल्या तक्रारीमुळेच एका धर्मांधाला अटक करण्यात आली होती. असे असूनही येथील अवैध बांधकाम मात्र अद्याप तसेच आहे. येथे रहदारीस मोठी अडचण होत असूनही या गोष्टीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

३. अतिक्रमित जागांवर उभारलेल्या या अवैध धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यात आले आहेत. या भोग्यांच्या सततच्या आवाजामुळे येथे घरी ‘ऑनलाईन’ शाळा चालू असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये आणि अभ्यास करण्यामध्ये पुष्कळ अडचणी येत आहेत. सतत होणार्‍या आवाजाच्या त्रासामुळे त्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होत असल्याचे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनेची आंदोलनाची चेतावणी !

शनी मंदिराजवळ ‘हिंदु ब्युरल ग्राउंड’ या नावाने हिंदूंचे मोठे पटांगण आहे; पण सध्या या जागेला ‘करबला मैदान’ असे नाव देऊन धर्मांधांनी या पटांगणावर अतिक्रमण केले आहे. या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी यांनी नगरपरिषदेशी पत्रव्यवहार केला आहे. ‘या पटांगणाची मोजणी करून हद्द निश्चित करावी आणि या जागेवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून हे मैदान हिंदूंसाठी खुले करावे; अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी या पत्राद्वारे त्यांनी दिली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *