Menu Close

‘ग्लोबल डिसमेंटलिंग हिंदुत्व’ या परिषदेला अमेरिका आणि कॅनडा येथील हिंंदूंच्या १५० संस्थांचा विरोध !

हिंदुविरोधी कार्यक्रमांच्या विरोधात तत्परतेने संघटित होऊन कृतीशील होणारे विदेशातील हिंदू कुठे आणि हातावर हात ठेवून गप्प बसणारे भारतातील कोट्यवधी सामान्य हिंदू कुठे ? भारतीय हिंदूंमधील धर्माभिमानशून्यतेमुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्म अन् त्यांची श्रद्धास्थाने यांच्याविरोधात गरळ ओकतो, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

न्यू जर्सी (अमेरिका) – अमेरिका आणि कॅनडा या देशांतील हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संस्था, मंदिरे आणि आध्यात्मिक संस्था अशा एकूण १५० संस्थांनी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या परिषदेला पाठिंबा देऊ नये, अशा आशयाचे एक निवेदन ४० विद्यापिठांना पाठवले आहे. परिषदेच्या सहप्रायोजक असलेल्या या विद्यापिठांमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी, त्यांचे पालक आणि माजी विद्यार्थी यांनीही विद्यापिठांना १ लाखांहून अधिक संगणकीय पत्रे (इ-मेल) पाठवून या हिंदुत्वविरोधी परिषदेला विरोध दर्शवला आहे. विद्यापिठांना पत्र पाठवणार्‍या या सर्व संस्थांचा समन्वय ‘कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेने केला आहे. या निवेदनावर स्वाक्षरी करणारे हे हिंदु मंदिरे, राष्ट्रीय स्तरावरील संस्था, हिंदूंच्या विविध धार्मिक संस्था आणि स्थानिक सांस्कृतिक मंडळे यांचे सभासद आहेत. अमेरिकेत रहाणार्‍या सहस्रो हिंदूंचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. या निवदेनाची एक प्रत कायदेतज्ञांना पाठवण्यात येणार आहे.

‘कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेचे अध्यक्ष निकुंज त्रिवेदी यासंदर्भात म्हणाले,

१. ‘‘अमेरिका आणि कॅनडा येथील १५० हिंदु संस्थांनी या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. यावरून येथेे रहाणार्‍या हिंदूंचा प्रक्षोभ दिसून येतो. या मोहिमेत अनेक ठिकाणचे हिंदू सहभागी झाले आहेत आणि हिंदुत्वाविषयी पूर्वग्रहदूषित अन् हिंदूंना ‘अतिरेकी विचारसरणीचे प्रचारक’ संबोधून हिंदुत्वाचा आवाज दडपण्याच्या हिंदुद्वेष्ट्यांच्या प्रयत्नांवरून चिंतित आहेत.

२. या परिषदेत सहभागी वक्ते अमेरिकेने आतंकवादी ठरवलेल्या नक्षलवादी आणि माओवादी यांसारख्या हिंसक गटांना पाठिंबा देणारे आहेत. बाकीच्या वक्त्यांनी अनेक प्रसंगी हिंदु धर्माचा विरोध करून हिंदु धर्मातील देवता, प्रथा आणि परंपरा यांचा अपमान केला आहे. या वक्त्यांना विरोध करणार्‍या हिंदूंवर ‘हिंदु वर्चस्ववादी गटाचे हस्तक  (एजंट्स ऑफ हिंदू सुप्रिमॅसिस्ट ग्रूप)’ असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये कोणत्याही विद्यापिठाने नोंदणी केल्यास त्यांनी भेदभावाला मान्यता दिल्यासारखे होणार आहे.

३. पाश्‍चिमात्य जगामधील सरकारी संस्था, महामंडळे, शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये ‘हिंदुत्व म्हणजे काय ?’ आणि ‘हिंदुत्व म्हणजे काय नाही ?’ याविषयी चर्चा करण्याचा कल दिसून येत आहे. हीच खरी समस्या आहे; कारण हिंदु धर्म हा विस्तृत असून अनुभवात्मक आणि विकेंद्रीकरण परंपरा असलेला धर्म आहे. त्यामुळे राजकीय विचारसरणी आणि विनाकारण निर्माण केलेले अपसमज यांतून हिंदुत्वाच्या सीमा ठरवणे, हे येथील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी धोकादायक असून त्यांच्या नागरी हक्कांवर अतिक्रमण केल्यासारखे आहे.

४. या विद्यापिठांतील हिंदु विद्यार्थी हे तात्पुरत्या ‘व्हिसा’वर अमेरिकेत रहात आहेत. त्यांना याचा परिणाम भोगावा लागू शकतो. काही वेळा हिंदु विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी हिंदु देवतांची चित्रे लावली, तर आक्षेप घेतला जातो. त्यामुळे विद्यापिठांनी हिंदु विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची हमी देऊन विद्यापिठांत विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्मांधतेला पाठिंबा दिल्यास त्याचा उलट परिणाम होऊन हिंदुविरोधी द्वेष उत्पन्न होईल.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *