Menu Close

केरळमधील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या जाळ्यात अडकत आहेत !

कॅथॉलिक बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट यांचा दावा

केरळमधील हिंदु आणि ख्रिस्ती मुली लव्ह जिहादला बळी पडून धर्मांध तरुणांच्या माध्यमांतून इस्लामिक स्टेटमध्ये भरती झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बिशप यांचा हा दावा कुणीही नाकारू शकणार नाही. याविषयी आता केरळमधीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील ख्रिस्त्यांनी याला विरोध केला पाहिजे आणि त्याला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

हिंदूंचे धर्मगुरु आणि नेते या जिहादविषयी बोलत असतांना त्यांना धर्मद्वेषी म्हणून टीका करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता गप्प का आहेत ?

कॅथॉलिक बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट

कोट्टायम (केरळ) – केरळ राज्यातील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्केटिक जिहाद’ (अमली पदार्थांचे व्यसन लावून मुलींचे जीवन उद्ध्वस्त करणे) यांच्या जाळ्यात अडकत आहेत. शस्त्रांचा वापर न करता धर्मांध तरुण इतर धर्मांतील तरुणींचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्केटिक जिहाद’ यांसारख्या मार्गांचा वापर केला जात आहे, असा दावा बिशप (चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेले पाद्री) मार जोसेफ कल्लारनगट्ट यांनी केला आहे. कोट्टायम जिल्ह्यातील कुरुविलंगडमध्ये चर्चेच्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी हा दावा केला. बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट हे सायरो मालाबार चर्चशी संबंधित आहेत.

‘नार्कोटिक जिहाद’ म्हणजे काय ?

मुसलमानेतर तरुण-तरुणींना अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. अशा प्रकारे शस्त्रांविना मुसलमानेतरांची युवा पिढी संपवली जाते. जिहाद म्हणजे इस्लामी धर्मयुद्धाचाच हा भाग आहे.

बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट यांनी मांडलेली सूत्रे

‘लव्ह जिहाद’द्वारे इतर धर्मांतील तरुणींचा आतंकवादासाठी वापर !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘लव्ह जिहाद’मध्ये मुसलमानेतर तरुणींना विशेषत: ख्रिस्ती समुदायातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर केले जाते, तसेच त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. जिहादी आतंकवादासारख्या विध्वंसक कामांसाठी त्यांचा वापर केला जातो. अशा जिहाद्यांच्या विरोधात इतर समाजातील लोकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे.

केरळ जिहादी आतंकवाद्यांचे भरती केंद्र !

केरळ हे जिहादी आतंकवाद्यांसाठी एक भरती केंद्र बनल्याचा, तसेच राज्यातील अनेक ख्रिस्ती आणि हिंदु तरुणी यांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना अफगाणिस्तानातील शिबिरांत पाठवले जाते. या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी होणे आवश्यक आहे.

‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ नाकारणार्‍यांचा स्वार्थ असू शकतो !

काही  राजकीय नेते, सामाजिक आणि सांस्कृतिक नेते, तसेच पत्रकार ‘केरळ राज्यात ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘नार्कोटिक जिहाद’ यांसारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही’, असे म्हणत आहेत.  ते वास्तवाकडे डोळेझाक करत आहेत. यामागे त्यांचा स्वार्थही असू शकतो.

बिशप यांच्या दाव्यांना ‘केरळ सुन्नी फेडरेशन’चा विरोध, (म्हणे) ‘धार्मिक फूट पाडणे हाच बिशप यांनी केलेल्या दाव्याचा उद्देश !’

जे सत्य आहेत, ते सांगितल्यावर इस्लामी संघटनांना मिरच्या झोंबणारच ! केरळमध्ये साम्यवाद्यांचे आघाडी सरकार असल्याने ते या जिहादची चौकशी करणार नाहीत; म्हणून केंद्र सरकारने पुढाकार घेऊन बिशप यांच्या दाव्यांवरून चौकशी करून सत्य देशासमोर ठेवावे आणि धर्मांधा अन् त्यांच्या संघटनांची तोंडे बंद करावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

केरळमध्ये धार्मिक फूट पाडणे हाच बिशप यांनी केलेल्या दाव्याचा उद्देश आहे. मुसलमान समुदायाला लक्ष्य बनवणार्‍या या आरोपांना बिशप यांनी पुरावे देऊन सिद्ध करावे. राज्यशासनाने बिशप यांचे हे आरोप गंभीरतेने घेत समाजात फूट पाडण्याचे कट-कारस्थान रचल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ‘केरळ सुन्नी फेडरेशन’कडून करण्यात आली आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *