Menu Close

हिंदुद्वेषी दुष्प्रचार रोखण्यासाठी वैचारिक चर्चा करून धर्माचे रक्षण करायला हवे ! – मनीषा मल्होत्रा, जागतिक युवा समन्वयक, ‘इनफिनिटी फाऊंडेशन’

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’द्वारे हिंदुविरोधी वैचारिक आतंकवाद’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन

मनीषा मल्होत्रा

पुणे – साम्यवाद्यांनी भारतातील विश्वविद्यालयांमध्ये साम्यवादी विचार पसरवून विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद करणे चालू केले. पाश्चात्त्य देशांतील विश्वविद्यालयांतूनही त्यांनी साम्यवादी विचार पसरवले. या विश्वविद्यालयांतून केवळ हिंदुद्वेष पसरवला जात आहे. साम्यवाद्यांनी ‘भारतीय (हिंदू) अत्याचार करतात. त्यांच्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आहे’, असा प्रचार केला. परिणामी विद्यार्थ्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी द्वेष आणि घृणा निर्माण होत आहे. हिंदूंच्या विरोधात गरळओक करण्यासाठी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’चे सहप्रायोजक असलेल्या जगातील ४० हून अधिक विश्वविद्यालयांच्या विरोधात सामान्य हिंदूंनी १० लाख ‘ई-मेल’ पाठवले आहेत. हे पुष्कळ मोठे कार्य आहे. हिंदुद्वेषी दुष्प्रचार रोखण्यासाठी वैचारिक चर्चा करून आपण धर्माचे रक्षण केले पाहिजे. यासमवेतच पाश्चिमात्य विचारसरणींच्या विरोधात उभे राहून लढण्याचे सामर्थ्य निर्माण होण्यासाठी प्रथम साधना आणि तपस्या केली पाहिजे, असे प्रतिपादन ‘इनफिनिटी फाऊंडेशन’च्या जागतिक युवा समन्वयक मनीषा मल्होत्रा यांनी केले. त्या हिंदु जनजागृती समितीने ६ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’द्वारे हिंदुविरोधी वैचारिक आतंकवाद’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होत्या. या कार्यक्रमात ‘एपिलोग न्यूज चॅनेल’चे अध्यक्ष अधिवक्ता टिटो गंजू यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. हा कार्यक्रम १ सहस्र ५३३ जणांनी पाहिला.

जिहाद्यांचा पराभव करण्याकरिता हिंदूंनी संपूर्ण जगासाठी कृतीशील आराखडा सिद्ध करावा ! – अधिवक्ता टिटो गंजू, अध्यक्ष, ‘एपिलोग’ न्यूज चॅनेल

अधिवक्ता टिटो गंजू

१. काश्मीरवर अधिपत्य गाजवून भारताचे इस्लामीकरण करण्याचा (‘गझवा-ए-हिंद’चा) जिहाद्यांचा डाव आहे. केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी हिंदूंनी कृतीशील आराखडा सिद्ध करायला हवा. हा आराखडा संपूर्ण विश्वाचे कल्याण करू शकतो. जिहाद्यांना पराभूत करण्याचा हाच एक उपाय आहे. त्यासाठी समाजाला जागृत केले पाहिजे. लोकशाही पद्धतीने संसदेमध्ये नवीन कायदे करण्यास भाग पाडले पाहिजे.

२. अमेरिकेच्या संरक्षण सचिव कॉनडोलिझा राईस म्हणाल्या की, युरोप आणि अमेरिका येथील बहुतांश विद्यापिठांमध्ये मुसलमानांचा पैसा आहे. त्यांनी विश्वविद्यालयांच्या माध्यमांतून त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करण्यास प्रारंभ केला आहे.

३. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार असलेली नरसंहाराची व्याख्या काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात तंतोतंत लागू होते; पण आजपर्यंत त्याला नरसंहाराची मान्यता देण्यात आलेली नाही.

४. साम्यवाद्यांचा ‘व्हर्बल टेररिझम्’ (वैचारिक आतंकवाद) नव्हे, तर त्याला ‘थेट आतंकवाद’च म्हटले पाहिजे. आतंकवादाला प्रोत्साहन देणे आणि त्याचे समर्थन करणे, हाही आतंकवादच आहे.

५. आपल्याकडे आतंकवादाची व्याख्याच नाही. ५ कोटी ‘ज्यू’ लोकांना मारले, याची चर्चा जगभर केली जाते; पण भारतात कोट्यवधी हिंदूंची धार्मिक द्वेषातून हत्या करण्यात आली आणि अजूनही ती चालूच आहे, याची चर्चा मात्र कुठेच होत नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *