पिंपरी – पिंपरी महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती स्वीकारण्यात येणार नाही, तसेच महापालिकेद्वारे संकलित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे विधीवत् आणि पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. (‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती न स्वीकारण्याचा पिंपरी महापालिकेचा निर्णय स्तुत्य आहे, तसेच श्री गणेशमूर्तींचे विधीवत् आणि पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल हेही स्तुत्य पाऊल आहे ! मात्र आजपर्यंतचा अनेक ठिकाणचा अनुभव पहाता प्रत्यक्षात तसेच होत आहे ना, याकडेही भाविकांनी लक्ष द्यावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
प्रत्येक प्रभागात ४ मूर्ती संकलन केंद्र, असे एकूण १२८ संकलन केंद्र उपलब्ध करून दिले आहेत, तसेच मूर्ती विसर्जन करण्यासाठी ४० महापालिकेची वाहने उपलब्ध आहेत, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. (भाविकांकडून मूर्ती घेऊन ती परत विसर्जित करण्याऐवजी महापालिकेनेच जर भाविकांना वहात्या पाण्यात विसर्जनाची सोय करून दिली, तर ते अधिक योग्य होईल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)