Menu Close

फटाक्यांच्या माध्यमांतून होणारे प्रदूषण न थांबवणार्‍या पोलिसांच्या विरोधात तक्रार करा !

फटाके फोडण्याच्या संदर्भात शासनाची नियमावली आहे. या नियमांचे सर्रास उल्लंघन करून फटाके फोडले जातात. फटाक्यांचा आवाज तर सर्वत्र होतो, तरी पोलिसांना गुन्हेगार सापडत कसा नाही ? कि पोलीस कामचुकारपणा करतात ?

वाचकांनो, सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यास बंदी आहे. आपल्या परिसरात उशिरापर्यंत  फटाके वाजवले जात असल्यास अशा ठिकाणांची नावे स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कळवावीत, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करावी.

https://cpcb.nic.in/uploads/SPCB_Directory.pdf

या लिंकवर सर्व राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या राज्यस्तरीय कार्यालयांचे पत्ते आहेत.

आपण याविषयी काही कृती केली असल्यास आपले अनुभव आम्हाला पुढील पत्त्यावर कळवा.

सुराज्य अभियान

संपर्क क्रमांक : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, ९५९५९८४८४४

ई-मेल पत्ता : [email protected]

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *