फरिदाबाद (हरियाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ११ सप्टेंबर या दिवशी ‘श्री गणपति’ विषयावर मार्गदर्शन आणि सामूहिक ‘अथर्वशीर्ष पठण’ ‘ऑनलाईन’ घेण्यात आले. मराठी भाषेतील या कार्यक्रमाचा लाभ फरिदाबाद आणि महाराष्ट्र येथील जिज्ञासूंनी घेतला. या कार्यक्रमाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी श्री गणेशाची शास्त्रीय माहिती आणि अथर्वशीर्ष पठण केल्याने होणारे लाभ सांगितले.
जिज्ञासूंचे अभिप्राय
› सौ. संगीता मांडे : अथर्वशीर्षाचा अर्थ एवढ्या चांगल्या प्रकारे ठाऊक नव्हता, तो आज कळला. यासाठी मी हिंदु जनजागृती समितीला धन्यवाद देते.
› सौ. स्नेहा टिके : अथर्वशीर्षाविषयी एवढी माहिती नव्हती, जी आज मिळाली. अथर्वशीर्षाचे पठण करतांना ज्याप्रमाणे थंड हवेची झुळूक आल्यावर गार वाटते, त्याप्रमाणे अतिशय शीतलता आणि शांती जाणवत होती.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक दैनिक सनातन प्रभात |