Menu Close

पत्नीची माहिती सांगत नसल्याच्या कारणावरून सासूची हत्या करणार्‍या धर्मांधाला पुण्यातून अटक !

  • मुंबई येथे आणखी एक धक्कादायक घटना !

  • सासूच्या हत्येनंतर तिच्या गुप्तांगात बांबू घुसवला !

  • शेख याच्या विरोधात २८ गुन्ह्यांची नोंद

अनेक गुन्हे करणार्‍या धर्मांधाला पहिल्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा झाली असती, तर पुढील गुन्हे करण्याचे त्याचे धाडस झाले नसते !

यावरून धर्मांधाची विकृती आणि क्रूरता लक्षात येते. अशा धर्मांधांवर पोलिसांनी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – येथील विलेपार्ले पूर्वेतील पितळेवाडी येथे २ सप्टेंबरच्या रात्री ११.३० वाजता आरोपी इक्बाल शेख याने पत्नीने दुसरा विवाह केल्याची माहिती सासू लपवत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात सासूची हत्या केली. हत्येनंतर त्याने सासूच्या गुप्तांगात बांबू घुसवला. शामल सिंगम असे सासूचे नाव असून त्या त्यांची मुलगी लिना हिच्यासमवेत रहात होत्या. या प्रकरणी पोलिसांनी ४ सप्टेंबर या दिवशी शेख याला भोसरी (जिल्हा पुणे) येथून अटक केली आहे.

१ सप्टेंबर या दिवशी धर्मांध शेख हा येरवडा कारागृहातून जामिनावर सुटला होता. तो कारागृहात असतांना त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला होता. शेख हा विलेपार्लेमधील बामनवाडा येथील रहिवासी आहे. इक्बाल आणि लिना यांचा वर्ष २०११ मध्ये विवाह झाला होता. या दोघांना १ मुलगा आणि १ मुलगी आहे. दहिसर येथे साखळीचोरीच्या प्रकरणी शेख याला ३ वर्षांच्या कारागृहाची शिक्षा झाली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो लिनाला भेटण्यासाठी आला होता.

लिनाच्या घरी गेल्यावर त्याला तिथे शामल यांनी ‘लिना हिने दुसरा विवाह केला असून तिला ११ मासांचा १ मुलगा आहे, तसेच ती आता पुन्हा गरोदर आहे’, अशी माहिती त्याला दिली. त्याने लिना यांनी दुसर्‍या पतीला सोडून पुन्हा येण्याच्या संदर्भात धमकी दिली. दुसर्‍या दिवशी तो पुन्हा लिना यांना भेटण्यासाठी गेला असता लिना तिच्या आईच्या घरी नव्हती. तेव्हा वाद झाल्यावर शेख याने फरशी आणि चाकू यांनी सासू शामल यांच्यावर वार केले. शेख याने सासूच्या हत्येनंतर तिच्या गुप्तांगामध्ये बांबू घुसवून त्यांचे आतडे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शेख याच्या विरोधात २८ गुन्ह्यांची नोंद असून ८ प्रकरणांमध्ये तो दोषी आढळून आला आहे, असे पोलीस निरीक्षक काणे यांनी सांगितले. शेख याला मुंबई येथून दोनदा तडीपारही करण्यात आले होते. चोर्‍या, साखळी चोरी आणि आक्रमण करणे, या गुन्ह्यांसाठी त्याच्या विरोधात अनेक तक्रारी प्रविष्ट आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *