सैनिकांकडून अप्रसन्नता व्यक्त !
याविषयी सरकारने चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
‘हलाल’ मांस म्हणजे काय ?हलाल पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि प्राण्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वहाते आणि नंतर त्या प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो. |
नवी देहली – केंद्र सरकारच्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’ने (‘एफ्.एस्.एस्.ए.आय’ने) प्रमाणित केलेल्या केंद्रांद्वारेच सैनिकांना हलाल मांसाचा पुरवठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हलाल मांस हिंदु, शीख आदी धर्मांमध्ये वर्जित आहे. हे मास केवळ इस्लाम धर्मात चालते.
सैन्याकडून प्रतिवर्षी सहस्रो टन मांसाची खरेदी या केंद्रांकडून केली जाते. या केंद्रांकडून सैनिकांना हलाल मांसाचा पुरवठा केला जात असल्याचे सैन्याच्या काही अधिकार्यांच्या निदर्शनास आले. हे कळाल्यावर अनेक सैनिकांनीही अप्रसन्नता व्यक्त केली. यावर सैन्याधिकार्यांनी पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांचे मंत्री, तसेच राज्यपाल यांना पत्र लिहून सैनिकांना पुरवठा केल्या जाणार्या मांसावर ते ‘हलाल’ आहे कि ‘झटका’, याचा उल्लेख करण्याचा आदेश देण्याची मागणी केली. ‘झटका’ प्रकारात प्राण्यांना एकच वार करून त्यांची हत्या केली जाते. यामुळे प्राण्याला अल्प वेदना होतात. हिंदूंमध्ये अशा पद्धतीचे मांस ग्रहण केले जाते. सैन्याधिकार्यांनी पाठवलेल्या पत्राला मात्र अजून कुणाकडूनही उत्तर मिळालेले नाही.