हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांचा आदर्श ठेवून प्रत्येकाने श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन होण्यासाठी प्रयत्न करा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
केर्ले (जिल्हा कोल्हापूर) – ग्रामपंचायत केर्लेच्या वतीने घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या अगोदर एक दिवस म्हणजे १४ सप्टेंबर या दिवशी एका रिक्शाद्वारे ‘श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन न करता त्या ग्रामपंचायतीकडे दान कराव्यात’, असे आवाहन करण्यात येत होते. ही गोष्ट येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रिक्शा थांबवली. रिक्शाद्वारे उद्घोषणा करणार्या संबंधितास त्यांनी ‘असे पुकारण्याच्या संदर्भात तुमच्याकडे काही लेखी आदेश आहे का?’, अशी विचारणा केली. यावर संबंधित व्यक्ती कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. यानंतर या रिक्शाचालकाने ग्रामपंचायतीत संपर्क केला असता त्यांना ‘उद्घोषणा थांबवा’, असा निरोप मिळाला. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांनी केर्ले ग्रामपंचायतीचा श्री गणेशमूर्ती दानाचा डाव उधळून लावला !
या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. रामभाऊ मेथे म्हणाले, ‘‘अशा प्रकारे उद्घोषणा चालू असल्याचे माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांच्याकडे प्रशासनाच्या आदेशाच्या कागदपत्रांची मागणी केल्यावर त्यांच्याकडे तसे काहीच नसल्याचे लक्षात आले. ही उद्घोषणा अशीच चालू ठेवल्यास मी त्यांना फौजदारी गुन्हा नोंद करण्याची चेतावणी दिली. यामुळे रिक्शाचालकाने काढता पाय घेतला. केर्ले गावात भाविक श्री गणेशमूर्ती विसर्जनासच प्राधान्य देतात. त्यामुळे दुसर्या दिवशी केवळ २५ श्री गणेशमूर्ती ग्रामपंचायतीस दान मिळाल्या होत्या. गेली अनेक वर्षे हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही श्री गणेशमूर्ती विर्सजन मोहीम राबवत असून त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’