Menu Close

मुंबई : तृप्ती देसार्इंविरुद्ध गावदेवीमध्ये दुसरा गुन्हा दाखल

trupti_desai

मुंबई : हाजी अली दर्ग्यात प्रवेश नाकारल्यानंतर भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसार्इंनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे वळवला. मात्र पोलिसांनी त्यांना गावदेवी परिसरातच अडवून ठेवले. त्यामुळे देसार्इंनी तेथेच निदर्शने करण्यास सुरुवात केल्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. गावदेवी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाजी अली दर्ग्याबाहेर परवानगी नसताना आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात देसाई यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, यात पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ गावदेवी पोलीस ठाण्यातही देसार्इंसह सहा महिला कार्यकर्त्यांविरुद्ध १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावदेवी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सोडून दिले. त्यानंतर देसाई तत्काळ पुण्याला निघून गेल्या. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी गावदेवी ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदर्भ : लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *