सोलापूर – येथील ‘सत्यदर्शन’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. रवींद्र जोगीपेटकर यांनी गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाच्या आरतीसह विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी ‘मंगलकार्याच्या आरंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व, श्री गणपतीला लाल फूल आणि दुर्वा का वहातात ?, पूजेमध्ये श्री गणेशाची मूर्ती शक्यतो डाव्या सोंडेची का असावी ?, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात विसर्जन शास्त्रानुसार कसे करावे, यांविषयी उपस्थितांना अवगत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सरदेशमुख यांनी केले, तर कु. तनुश्री जोगीपेठकर (वय ९ वर्षे) आणि चि. सोहम् जोगीपेठकर (११ वर्षे) यांनी श्री गणेशस्तोत्र, गणेशस्तवन, हनुमान चालीसा, गणपतीचे श्लोक यांचे पठण केले. या कार्यक्रमात अन्य मान्यवरही उपस्थित होते.
सोलापूर आकाशवाणी केंद्रावर सनातन संस्थेने गणेशोत्सवानिमित्त संकलित केलेल्या माहितीचे प्रसारण !
सोलापूर आकाशवाणी केंद्रावर सनातन संस्थेने गणेशोत्सवानिमित्त संकलित केलेल्या माहितीचे १६ सप्टेंबर या दिवशी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी प्रसारण करण्यात आले. या वेळी ‘मंगलकार्याच्या आरंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व, ‘श्री गणपतीला लाल फूल आणि दुर्वा का वहातात ?’, तसेच ‘कोरोना संसर्गाच्या काळात श्री गणेशमूर्ती विसर्जन शास्त्रानुसार कसे करावे ?, यांविषयी शास्त्रशुद्ध माहिती प्रसारित करण्यात आली.