Menu Close

‘हिंदुत्व फॉर ग्लोबल गुड’ (जगाच्या कल्याणासाठी हिंदुत्व) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून केलेल्या हिंदुद्वेषी प्रसाराचा प्रतिवाद करण्यासाठी परिषदेचे आयोजन !

हिंदुद्वेष्ट्यांचा वैचारिक आतंकवाद रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ आयोजकांचे अभिनंदन ! – संपादक दैनिक सनातन प्रधान

कार्यक्रम पहाण्यासाठी लिंक

परिषद प्रतिदिन १ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. त्याचे थेट प्रसारण

live : fb.com/hindutvaforglobalgood या लिंकवर करण्यात येणार आहे.

नवी देहली – अमेरिकेतील हिंदुद्वेष्ट्यांकडून नुकतेच ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन) या आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषदेच्या माध्यमातून हिंदूंच्या विरोधात द्वेष पसरवण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर हिंदु धर्म, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळओक करण्यात आली. त्यामुळे वातावरणामध्ये निर्माण झालेले मळभ दूर करून हिंदुत्वाचे चैतन्य निर्माण करण्यासाठी ‘हिंदुत्व फॉर ग्लोबल गुड’ : द इसेन्स ऑफ हिंदुइझम् म्हणजे ‘जगाच्या कल्याणासाठी हिंदुत्व : हिंदु धर्माचे सार’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोेजन करण्यात आले आहे. या माध्यमातून हिंदुत्वाचे महत्त्व जगासमोर मांडण्यात येणार आहे. १ ते ३ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये होणार्‍या या ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये १८ सत्रे आयोजित करण्यात आली असून त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवर संबोधित करणार आहेत.

‘हिंदुत्व फॉर ग्लोबल गुड’ या परिषदेला संबोधित करणारे मान्यवर !

१. डॉ. चंदन उपाध्याय, प्राध्यापक, बनारस हिंदु विश्‍वविद्यालय

२. डॉ. संगीत रागी, प्राध्यापक, देहली विश्‍वविद्यालय

३. डॉ. रतन शारदा, लेखक आणि स्तंभलेखक

४. डॉ. सत प्रशर, माजी संचालक, आय.आय.एम्. इंदूर, मध्यप्रदेश

५. डॉ. ओमेंद्र रत्नु, जयपूर, राजस्थान

६. प्रा. सुजाता त्रिपाठी, लाल बहाद्दुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्‍वविद्यालय

७. डॉ. के. परमेश्‍वरन्, प्राध्यापक, गुजरात कायदा राष्ट्रीय विश्‍वविद्यालय

८. श्री. आदित्य सत्संगी, संस्थापक, अमेरिकन्स फॉर हिंदुज

९. प्रा. डॉ. लावण्य वेमसानी, शॉनी स्टेट विश्‍वविद्यालय, ओहियो, अमेरिका

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *