पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशी चालू !
जमावाकडून होणार्या मारहाणीवरून हिंदूंना असहिष्णु ठरवून पुरस्कार परत करणारे साहित्यिक, अभिनेते आदी या घटनेविषयी गप्प का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
रायसेन (मध्यप्रदेश) – येथील सरकारी शाळेत ८ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी पवन सेन नेहमी कपाळावर टिळा लावून शाळेत जात असे. त्याला धर्मांध शिक्षिका निशात बेगम हिने बाहेरील लोकांना सांगून अमानुष मारहाण करण्यास लावल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत पवन बेशुद्ध झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. पवनच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी शिक्षिका निशात बेगम हिने तिच्यावरील आरोप फेटाळले आहेत.
Madhya Pradesh: Teacher Nishaad Begum gets a class 8 student beaten up for sporting ‘tilak’ to school, NCPCR orders probehttps://t.co/5Slav5dzIU
— OpIndia.com (@OpIndia_com) September 22, 2021
पवन शाळेत जातांना वाटेत मंदिरात जात असे. तेथे तो कपाळावर टिळा लावत असे. त्याला शिक्षिका निशात बेगम हिने अनेकदा टिळा न लावण्यास सांगितले होते; मात्र पवन टिळा लावूनच शाळेत येत होता.